नामदार एकनाथ शिंदे यांच्या वाढ दिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव मध्ये मास्क वाटप.

नामदार एकनाथ शिंदे यांच्या वाढ दिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव मध्ये मास्क वाटप.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मध्ये वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या मार्फत आरोग्य सुरक्षितेसाठी या राज्याचे नामदार नगर विकास मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने शाळेतील मुलांना मास्क वाटप करण्यात आले.

        यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .

      या कार्यक्रम प्रसंगी शिर्डी लोकसभा शिवसेना मतदारसंघाचे समन्वयक मकरंद राजहंस, ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, देडंगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .विद्यमान सरपंच यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट लक्षात घेता हा चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला .यावेळी ग्रामस्थांच्यावतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचे अभिनंदन करण्यात आले .

   या कार्यक्रमास उपस्थित नितीन राव मनुरकर कुकणा प्रमुख ,विशाल म्हस्के, शिरसगाव, नेवासा तालुका शिवसेना समन्वयक अनिल राव नाबदे , नवाब शहा सर, देशमुख सर, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे ,व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, महादेव मुंगसे, नवनाथ मुंगसे, किशोर वांढेकर ,वंचित बहुजन आघाडीचे बलभीम सकट, नितीन ससाने, रमेश संचेती ,तसेच जिल्हा परिषद चे प्राचार्य भोसले सर , बथुवेल हिवाळे सर ,धामणे सर ,बाळासाहेब येडे सर ,कदम मॅडम , करांडे मॅडम, शिक्षक उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक युनूस पठाण यांनी केले तर आभार किशोर मुंगसे यांनी मान

ले.