अखेर श्रीरामपूरात अतिक्रमणावर हतोडा
अनेक वर्षांपासुन श्रीरामपुर शहराच्या सर्व प्रमूख रस्त्यांना अनधीकृत अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे . त्यामुळे सर्व रस्ते अरूंद होऊन वाहन धारकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत . ठिकठिकाणी फूटपाथवर छोटया व्यावसायीकांनी टपऱ्या थाटल्या आणी मोठया दुकानदारांनी पत्र्याचे शेड वाढवून रस्त्यात सिमेंट ओटा घातल्याने फूटपाथ जणू गायबच झाला होता . यामुळे प्रामाणीक दूकानदारांवर मागे पडून हतबल होण्याची वेळ आली . प्रशासनाकडे अनेक तक्रारी जाऊनही हितसंबंधांमुळे अनेक वर्षांपासून कारवाई झाली नाही .
गेल्या आठवड्यात चारही प्रमूख रस्त्यावर पालीकेच्या वतीने अतिक्रमणधारकांना खुणा करून अतिक्रमण काढण्याच्या सुचना दिल्या गेल्या . परंतु काहीच होत नाही अश्या भ्रमात नागरीक असतांना आज मंगळवार सकाळी प्रचंड मोठ्या पोलीस बंदोबस्तात ३ जेसीबी घेऊन पालिकेने अतिक्रमण हटवायला सुरुवात केली आणी एकच गडबड झाली . अनेक छोटे टपरीधारक आपआपल्या दूकानातील सामान इतरत्र हलवायला धावू लागले . हि कारवाई बघायला नागरीकांनी प्रचंड गर्दी केली .पोलीसांनी गर्दीला आळा घालत वाहतुक सुरळीत ठेवण्यास कसरत घेतली . सकाळी १०वा सुरुवात करत संध्याकाळी ५वा पर्यंत बेलापूर रोड अतिक्रमण मुक्त झाला . आता उरलेल्या संगमनेर रोड , मेन रोड , नेवासा रोड व शिवाजी रोड लवकरच अतिक्रमण मुक्त होईन याची चर्चा नागरीकांमध्ये सुरु आहे .