महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 710 किलो गीमांस व टेम्पो असा एकुण 6,06,500 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई .
महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 710 किलो गोमांस व टेम्पो असा एकुण 6,06,500/- (सहा लाख सहा हजार पाचशे) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अहमदनगर यांनी पोनि/ दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/ दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/सचिन अडबल, पोकॉ/रोहित मिसाळ, पोकॉ/रणजित जाधव, पोकॉ/शिवाजी ढाकणे असे पोलीस अंमलदाराचे पथक नेमुण त्यांना अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
त्यानंतर वरील पोलीस पथक अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत जुने कलेक्टर ऑफिस रोडने चांदणी चौक मार्गे सोलापुर रोडने अहमदनगर येथुन टेम्पो मधुन महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे जनावरांचे गोमांसची वाहतुक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने सदर टेम्पोवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्याने पोलीस पथकाने जुने कलेक्टर ऑफिस जवळ अहमदनगर या ठिकाणी सापळा लावुन थांबले असता पथकास बातमीतील वाहन येतांना दिसल्याने सदरचे वाहन थांबवुन वाहनाची पंचासमक्ष झडती घेता सदर वाहनामध्ये गोमांस असल्याची खात्री झाल्याने सदर वाहनचालकास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव गुलाब बनीलाल शेख वय 32 वर्षे, रा. खेड, ता. कर्जत, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले.
सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या कब्जात 1,06,500/- रुपये किमंतीचे अंदाजे 710 किलो अर्धवट कापलेले गोमांस व गोमांस वाहतुकीसाठी वापरेला एक 5,00,000/- रुपये कि. चा अशोक लेलन्ड दोस्त टेम्पो क्रमांक एम. एच. 16 सी. डी. 6035 असा एकुण 6,06,500/- किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर बाबत पोकॉ/2600 रोहित मधुकर मिसाळ नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर याचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु. र. नं. 1207/2023 भादवी कलम 269, 34 महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1995 चे (सुधारणा) 2015 चे कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, अनिल कातकाडे , उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.