अहमदनगर च्या श्रीरामपूर अशोकनगर मधिल प्रसिद्ध मोहटादेवी मंदीरात चोरट्यानी मारला डल्ला..

अहमदनगर च्या श्रीरामपूर अशोकनगर मधिल प्रसिद्ध मोहटादेवी मंदीरात चोरट्यानी मारला डल्ला..

श्रीरामपूर शहरा नजीक अशोकनगर असणाऱ्या गावा मध्ये काल रात्री एक वाजून वीस मिनिटांनी चोरट्यांनी अशोक नगर गावात प्रसिध्द असणाऱ्या मोहटादेवी मंदिरातील दान पेटीवर डल्ला मारत त्यातील रोख रक्कम व तिच्या मध्ये असणाऱ्या दागिन्यांची पेटी फोडून चोरी करून घेऊन गेले आहेत. 

   घटनेची रितसर हकीगत अशी की काल रात्री 10 ते 11 च्या दरम्यान मोहटादेवी मंदिराचे पुजारी बाबासाहेब ढाकणे यांनी मंदिराच्या सभा मंडपाला असणाऱ्या दरवाजांची दोन कुलपे व्यवस्थितपणे लावून घरी गेले.त्यानंतर ते सकाळी पहाटे 5 वाजता मंदिर उघडण्यासाठी आले असता त्यांना मंदिराच्या सभा मंडपाला लावलेले कुलूप तोडलेले असल्याचे आढळून आले त्यानंतर त्यांनी तात्काळ मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करून बघितले असता त्यांना मंदिरासमोर ठेवलेली दान पेटी नसल्याचे आढळून आले असता त्यांनी तात्काळ मंदिराचे विश्वस्थ असणारे किशोर चिंतामणी भीमराज बारगजे,भगवान डोंगरे , बाबासाहेब आंधळे ,मदन कुंदे या सर्वाना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्या नंतर मंदिरात व मंदिराच्या बाहेर असणारे cctv चे फुटेज तपासल्या नंतर असे आढळून आले की मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या च्या दरम्यान मंदिराच्या प्रमुख सभा मंडपाच्या प्रवेश दाराजवळ असणारा कॅमेरा चोरट्यांनी प्रवेशद्वारा जवळ असणाऱ्या लहान भिंतीवर चढून फिरवल्याचे लक्षात आले, तरी देखील कॅमेऱ्याच्या फुटेज मध्ये सभा मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडताना दोन जण आढळून आले.त्यानंतर त्या दोघांनी मंदिरात प्रवेश करून कटरच्या साह्याने साखळीने पक्की केलेली दानपेटी साखळी तोडून घेऊन जात असल्याचे आढळून आले.सर्व विश्वस्तांनी ही घटना बघितल्यानंतर या सर्वांनी मिळून दानपेटी शोधण्याचा प्रयत्न केला असता मंदिरातील दानपेटी ही काही अंतर असलेल्या शेतात त्या शेताला असलेले तारेचे कुंपण तोडून दानपेटीला असलेली दोन कुलुपे कटर च्या साह्याने तोडून त्यातील असलेली सर्व रोख रक्कम व दागदागिने चोरून नेलेल्या अवस्थेत आढळून आली. मंदिराचे ट्रस्टी यांनी घटनेची हकीगत त्वरित पोलीस कॉन्स्टेबल संतोष परदेशी,पोलीस कॉन्स्टेबल कांबळे गणेश, गायकवाड,राजेंद्र देसाई या पोलिसांना कळवली असता पोलिसांनी लगेचच अशोकनगर याठिकाणी धाव घेऊन सर्व घटनेची पाहणी करुन पोलीस अधिकारी जीवन बोरसे ,ए.पी.आय. समाधान सोळंकी यांना चोरीच्या घटनेची माहिती तात्काळ दिली.त्यानंतर पोलिसांनी ठसे तज्ञाना पाचारण केले होते. 

मंदिराचे पुजारी बाबासाहेब ढाकणे , विश्वस्त किशोर चिंतामणी ,मदन कुंदे, भिमराज बारगजे, भगवान डोंगरे ,बाबासाहेब आंधळे, तसेच मंदिराचे सभासद अजित राऊत ,दिलीप आंधळे, सचिन शहाणे, संतोष गोरडे ,विलास टाक ,या सर्वांनी पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची माहिती लेखी स्वरूपात पोलिसांना दिली आहे. अशोकनगर , निपाणी वडगांव,मातापुर,जगताप वस्ती अशा अनेक वस्त्यांवर शेळ्या ,काहीच्या घरात दागिने,तसेच चंदनाच्या झाडांच्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत व अजूनही चोरीच्या घटना घडत आहेत.परंतु अद्याप पर्यंत चोर सापडलेले नाहीत.चोरट्यांनी गावांसह वस्त्यांवर चोऱ्या करून आता देवाचे मंदिर देखील सोडलं नसल्याने अनेक नागरिकांन मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.घडलेल्या घटनेने अशोकनगर तसेच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकारी व पोलीस कॉन्स्टेबल घटनेचा तपास करीत आहेत..!