सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचेच आरोग धोक्यात.
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी//संभाजी शिंदे
सोनई प्राथमिक केंद्राच्या आवारात ड्रेनेज पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून घानीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
मोठे डबके साचलेले आहे .
त्यामुळे आरोग्य केंद्राच्या परिसरात प्रचंड दूषित पाण्याचा प्रवाह दिसून येत आहे .सदरचा प्रवाह पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन कडे जाताना चे चित्र या ठिकाणी दिसून आले.
याबाबत आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे यांना विचारणा केली असता सदर कामाबाबत इंजिनियर भेट देऊन गेलेले आहेत व एक महिन्यानंतर काम होईल अशी माहिती मिळाली.
सोनई परिसराचं आरोग्य केंद्र जर अशा दुर्गंधीच्या वातावरणात असेल तर परिसराचं काय होणार हा प्रश्न आता भेडसावत आहे.यावरून स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजल्याचे दिसून येते घोषवाक्य द्वारे विविध ठिकाणी लोकांना जनजागृतीचे काम करणारे झोपेत आहेत का ?
नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या आरोग्य केंद्राच्या परिसरात जर अशी दुर्गंधी राहिली तर नवजात बालक , वृद्ध व आजारी नागरिक यांच्या आरोग्यावर या गोष्टीचा विपरीत परिणाम होईल याची प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य केंद्राच्या परिसरात साफसफाई होत नसल्याचे दिसून येते गवत पालापाचोळा कागद यामुळे आरोग्य केंद्राचेच आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळते.इतके दिवस ही समस्या समोर असूनही डोळे झाक कशासाठी?
. या प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल पुरवठा निरीक्षकाची जागा रिक्त असल्याकारणाने नेहमीच औषधाचा तुटवडा भासतो .व्हीआयपी साठी विशेष औषधाचा साठा तर गोरगरीब मात्र औषधांपासून वंचित राहतात.उपकेंद्रांना मोजकीच औषध दिली जातात त्यामुळे सोनई परिसरातील नागरिकांची हेळसांड होताना दिसून येते.
या गोष्टीला जबाबदार कोण ?