रत्नागिरी येथील चंपक मैदानावर मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमास संबोधित केले.
रत्नागिरी ( प्रतिनिधी) : ममुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ओवाळणी देण्याचं भाग्य मला लाभलं. या प्रयत्नांना अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे बळ लागले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून टुरिस्ट बसेस चालवून इथल्या महिलांनी देशासमोर सबलीकरणाचे आदर्श उदाहरण प्रस्थापित केले याबद्दल अभिनंदन करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार यापुढेही कार्यरत असेल हा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.