पापडीवाल परिवाराचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे -संजय छल्लारे.
श्रीरामपूर-येथील समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारे व समाजाप्रती निष्ठा ठेवून कार्य करणारे पापडीवाल परिवाराचे कार्य व उपक्रम हे समाजाला प्रेरणा व दिशादर्शक असतात. त्यांचा आदर्श इतर समाजातील लोकांनी घेऊन समाजाप्रती असणारी आस्था यातून व्यक्त होते.असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय छल्लारे यांनी व्यक्त केले.
पापडीवाल परिवाराच्यावतीने नुकतेच जिजामाता तरुण मंडळाला शवपेटी प्रदान करण्याचा कार्यक्रम जिजामाता चौकात आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे पत्रकार अनिल पांडे, राजेंद्र बोरसे प्रकाश कुलथे गुलाब झांजरी लतीफ सय्यद संजय कासलीवाल शिवसेनेचे लखन भगत शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश घुले महेंद्र टाटिया सुधीर वायखिंडे संजय साळवे अतुल शेटे बापू बुधेकर सिद्धांत छल्लारे तालुकाप्रमुख सुरेश थोरे गोकुळ पापडीवाल विशाल पापडीवाल सागर पापडीवाल आदी या प्रसंगी उपस्थित होते
अनिल पांडे म्हणाले नवनवीन योजनांतून सर्वांचा विकास होतो आज पापडीवाल परिवाराने समाजासाठी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे त्यांनी शवपेटी प्रदान करण्याचा हेतू चांगला असून या शवपेटीचा समाजाला खूप उपयोग होणार आहे. आपल्या आईची आठवण म्हणून त्यांनी हे सत्कार्य करून खरोखर सेवा केली आहे. त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. जिजामाता तरुण मंडळ हे समाजासाठी अहोरात्र झटणारे असून कोणत्याही प्रकारचे कार्य करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात अनेकांच्या मदतीला धावून जाणे व त्यांच्या कार्यात सहभागी होणे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे अशा कार्यामुळेच समाजामध्ये जिजामाता तरुण मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
माजी आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले जिजामाता तरुण मंडळ आणि पापडीवाल परिवार ह्या दोघांचं हे कार्य पाहून खरोखरच खूप समाधान वाटते समाजामध्ये असे कार्य करणारे व दानशूर लोक असणे ही समाजासाठी जमेची बाजू आहे पापडीवाला परिवार हा नेहमीच धार्मिक वृत्तीचा राहिलेला आहे त्यांनी त्यांच्या आईच्या प्रित्यर्थ दिलेली ही शवपेटी हे त्याचं उदाहरण आहे. यातून पापडीवाला परिवारावर त्यांच्या आईने केलेले संस्कार हे दिसून येतात.
या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक लक्ष्मण कुमावत तेजस बोरावके पियुष कर्नावट चंद्रकांत कर्नावट राजेंद्र भांबरे दीपक भालेराव तुषार संपत सुनील गलांडे सलाउद्दीन शेख देवेन पीडिया विकी गंगवाल संतोष भांबरे प्रमोद गायकवाड शरद गवारे पारस पाटणे विशाल दुपट्टी शिवा पानसरे पवन सूर्यवंशी उमेश छल्लारे दर्शना पापडीवाल श्रीमती छाया गंगवाल हेमंत सारंगधर सुहास परदेशी विवेक धुळे राजेंद्र भोसले सुरेश कांगणे दिपक कदम रितेश रोटे दत्ता करडे अजय छल्लारे विजय सेवक ज्ञानेश्वर सारंगधर अनिल सोमवंशी लोकेश नागर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.