तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी पोलिसांनी केला जेरबंद .
*तीन वर्षापासून फरार असलेला पाहिजे फरारी आरोपी दिनांक 12/03/2024 रोजी राहुरी पोलिसांकडून अटक.*
राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 19/2020 भादवि कलम 420,406 प्रमाणे दाखल गुन्हे मधील आरोपी नामे सचिन बाळासाहेब सोनवणे राहणार मुसळवाडी टाकळीमिया तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर हा गेले तीन वर्षापासून फरार होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वये चालू असलेल्या फरार आरोपी शोध मोहिमे दरम्यान राहुरी पोलिसांना सदर आरोपी बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास राहुरी पोलिसांनी, 12 3 2024 रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर करून पुढील पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास सहा फौजदार आव्हाड व सहा फौजदार अहिरे हे करत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोसई चारुदत्त खोंडे पो.हे.कॉ.सुरज गायकवाड, पो.हे.कॉ.राहुल यादव, पो.ना.प्रविण बागुल, लेखनिक पाखरे, गोपनीय शिंदे,पो.कॉ.प्रमोद ढाकणे, पो.कॉ.नदिम शेख, पो.कॉ. अंकुश भोसले, पो.कॉ.सतिष कुऱ्हाडे , पो.कॉ.सचिन ताजणे, पो. का गोवर्धन कदम नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.