अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या मेहुण्यास मदत करणारा दाजी पोलिसांनी केला अटक .

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या मेहुण्यास मदत करणारा दाजी पोलिसांनी केला अटक .

*अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या मेहुण्यास मदत करणारा दाजी राहुरी पोलिसांकडून अटक*

 

             दि.28/09/2022 रोजी राहुरी पोलीस ठाणे येथे अल्पवयीन मुलीस पळून नेण्याबाबत गुन्हा क्रमांक 931/2022 363, 366 (अ), पोक्सो अधि कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्या अनुषंगाने अल्पवयीन मुलगी व तिला पळवून नेणारा आरोपीस अटक करण्यात आली होती परंतु सदर आरोपीला मदत करणारा त्याचा दाजी नामे नारायण चांगदेव पवार वय 38 वर्ष, धंदा ड्रायव्हर राहणार सावेडी नाका अहमदनगर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. राहुरी पोलीस स्टेशनचे पोनि संजय ठेंगे यांना गोपनिय माहीती मिळाली की, सदर आरोपी राहुरी परिसरात फिरत आहे व तो मिळुन येईल अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने पोनी संजय ठेंगे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नमुद ठिकाणी जाऊन सापळा रचुन सदर इसम हा संशयीत रित्या फिरत असताना त्यास शिताफिने ताव्यात घेण्यात आले आहे व त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करीत आहेत.

 

             सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक कलुबर्मे , मा.उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे , यांचे मार्गदर्शना खाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोसई सी आर खोंडे, पोहेकॉ/ सुरज गायकवाड, पोहेकॉ/ राहुल यादव, पो.कॉ/ प्रमोद ढाकणे, पो.कॉ/ सचिन ताजने, पो.कॉ/ नदीम पो.कॉ/ इफ्तेखार सय्यद पो.कॉ/ अंकुश भोसले, आजिनाथ पाखरे, गोवर्धन कदम, गोपनीय अशोक शिंदे, पोलीस नाईक संतोष दरेकर, नेमणूक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांनी केली आहे.