मा.खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्र पर्वाची सुरुवात.

मा.खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्र पर्वाची सुरुवात.
मा.खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्र पर्वाची सुरुवात.

नंदुरबार ( प्रतिनिधी ) :-    मा.खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्र पर्वाची सुरुवात आज नंदुरबार येथून करण्यात आली. भारत जोडो न्याय यात्रेसाठी मोठा जनसमुदाय नंदुरबार येथे उपस्थित होता. सर्वजण आज भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागतासाठी जमले होते.

             माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी या लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार मधून करत होत्या, स्व. राजीव गांधी यांनीही आपली लोकसभा निवडणुकीची सुरुवात नंदुरबार मधूनच केली होती, त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांनी देशातील आधार कार्डचा शुभारंभ नंदुरबार मधूनच केला होता. आणि आज पुन्हा एक ऐतिहासिक क्षण आपल्याकरता आहे, आपल्यामधे राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा घेऊन आले आहेत. खुप मोठी परंपरा या जिल्ह्याला असून बिरसा मुंडा यांच्या चळवळीची परंपरा येथे आहे. सन 1942 साली जेव्हा चलेजाव आंदोलनाची घोषणा झाली तेव्हा नंदुरबार मध्ये शिरीष कुमार या बालकाने आपले पहिले बलिदान दिले. याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.

           येथील सर्वांनीच पूर्वीपासून काँग्रेस पक्षाला मोठी ताकद दिली आहे. पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आता नंदुरबार मध्ये महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर आणायचा आहे. श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे नेतृत्वात पुन्हा देशात काँग्रेसचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे, याचा आपण आज निश्चय करूयात.मागे राहुल गांधी यांनी 4000 किलोमीटर पर्यंत पदयात्रा काढली. तेव्हा ते कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत गेले आणि आता ते मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा करत आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून लाखोंनी लोक जोडले जात आहे.

            देशात हुकूमशाही येऊ नये म्हणून आपली राज्यघटना टिकवली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला त्यामुळेच गरिबातील गरीब माणसाला किंमत आली. आपला देश हा मार्गदर्शक तत्त्वांनी व शांततेच्या मार्गाने पुढे गेला पाहिजे. त्यासाठी राहुलजींनी ही भारत जोडो न्याय यात्रा काढली आहे, आपण सर्वजण मिळून राहुलजींच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार आणूया.

              या सभेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश,विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री के. सी. पाडवी,गुजरातचे प्रदेशाध्यक्ष खा. शक्तिसिंह गोहिल, अमित चावडा, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे,  AICC  सचिव आशिष दुवा, बी. एम. संदीप, रामकिसन ओझा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कुणाल राऊत, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, प्रतिभा शिंदे, नंदूरबार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिरिष नाईक आदी उपस्थित होते.