मन्वंतर सामाजिक संस्थेच्या वतीने भाऊसाहेब सावंत सर यांना आदर्श शिक्षक तर विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर.

मन्वंतर सामाजिक संस्थेच्या वतीने भाऊसाहेब सावंत सर यांना आदर्श शिक्षक तर विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मन्वंतर सामाजिक संस्था राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ 2023 व तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल देडगाव शाळेचा पुस्तक विना शाळा फेज 4 या प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडला.

        ज्येष्ठ समाजसेवक व अध्यक्ष न्याब युनिट महाराष्ट्र, नाशिक श्री .रामेश्वर जी कलंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विजय कदम सर यांनी केले.व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकाडमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रो.डॉ.साताप्पा चव्हाण ,, कृषी अधिकारी संजय कदम, देडगाव सरपंच चंद्रकांत मुंगसे , मा. उपसभापती कारभारी चेडे ,जेऊर गावचे सरपंच रामदास खराडे , अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक रामेश्वर चोपडे, नेवासा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष विठ्ठल काळे प्रमूख मान्यवर लाभले. यावेळी काही मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत शाळेचे कौशल्य ,संस्कृती ,क्वालिटी, नियोजन ,अतिशय शिस्तबद्ध, ग्रामीण भागातील शाळा असूनही शहरी शाळेला मागे टाकेल अशी शाळा, एक जिद्दीन भरलेली शाळा व अशा अनेक विषयावर बोलून या शाळेला शुभेच्छा देत अभिनंदन केले.

       यावेळी श्री .भाऊसाहेब सावंत सर देडगाव, प्रा. डॉ.सचिन मोरे अहमदनगर, व सौ. लीलाताई राजेंद्र लाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॉक्टर प्रांजली खेडकर चापडगाव यांना आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला . दिव्यांग स्नेही आदर्श सामाजिक संस्था चे प्रशांत सुळे मुंबई यांना दिव्यांग मित्र आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

        यानंतर प्रमुख मान्यवरांचा सन्मान करत. तक्षिला मीडियम स्कूलचे गुणी , होतकरू विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते व मुलांनी स्वतः बनवलेल्या कलाकृती चे प्रदर्शन प्रमुख मान्यवरांनी पाहिले व माहिती घेतली.

        यावेळी भाऊसाहेब मुंगसे , मा. चेअरमन कारभारी मुंगसे ,बाबासाहेब मुंगसे, पत्रकार बन्सी भाऊ एडके, उपसरपंच लक्ष्‍मणराव गोयकर, उत्तम फोटोग्राफर भास्करराव गोयकर ,हर्षल भारदे, डॉ. सुधाकर तिडके,दीपक गडाख सर व तक्षिला इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांचे परिसरातील पालक ,

ग्रामस्थआदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली सावंत मॅडम व सई विजय कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम सर यांनी मानले.