वाग वहिवाटीच्या रस्ता दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई न केल्यामुळे अखेर शेतकऱ्यांचे उपोषण सुरु .

वाग वहिवाटीच्या रस्ता दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई न केल्यामुळे अखेर शेतकऱ्यांचे उपोषण सुरु .

वाग वहिवाटीच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई न केल्यामुळे अखेर शेतकऱ्यांचे उपोषण सुरू.

  उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिंगणापूर पोलिसांचा पोलीस बंदोबस्त.

 

             खरवंडी येथील शेतकऱ्यांच्या शेताच्या वाग वहिवाटीच्या रस्त्यास हरकत करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी यासाठी खरवंडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी असा अर्ज दिला आहे की आम्ही खाली सह्या करणार सर्व शेतकरी मौजे खरवंडी, ता. नेवासा येथील रहिवासी असून आमच्या शेतजमीनी तसेच वस्त्यांच्या वाग वहिवाटीच्या रस्त्याच्या खडीकरण तसेच डांबरीकरण कामास नुकतीच मंजूरी मिळून प्रत्यक्षात या रस्त्याचे कामही सुरु झालेले आहे. 

     सदरच्या रस्ता सुमारे शंभर वर्षापासून आमच्या नियमित वाग वहिवाटीचा असून तो संपूर्ण कच्च्या स्वरुपात असल्याने प्रामुख्याने पावसात रस्त्याने वहिवाट करणे जिकीरीचे बनत होते.

    शेतीच्या मशागतीची वाहने तसेच बी-बियाणे, खते वाहतुकीची वाहने चालवणे मुश्कील होत होते. या परिसरातील शेतकरी दुग्धोत्पादनही करत असल्याने त्यांना विहित वेळेत सेंटरपर्यंत दूध पोहोचविण्यात अडचणी येत होत्या .आमच्या मुला-मुलींना शाळेत जाण्या-येण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

    आमच्यापैकी कुणा शेतकरी कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास त्याला दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी मोठे दिव्य पार पाडावे लागत आहे.

    या सर्व अडचणींमुळे आम्ही गेल्या काही वर्षापासून लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुन सदर रस्त्याच्या मजबुतीकरण तसेच डांबरीकरण कामास मंजूरी मिळवली आहे. सदर काम प्रत्यक्षात सुरु झाल्यानंतर काही अंतरावर . अर्जुन जगन्नाथ नवगिरे (गट नं. २३९/४) या व्यक्तीने बेकायदेशीरपणे हरकत अडथळा निर्माण केला आहे. वास्तविक सदर व्यक्तीच्या हितसंबंधास या रस्त्याच्या मजबुतीकरण, डांबरीकरण कामाने कुठलाही धक्का लागत नसताना तसेच या रस्त्यालगतच्या इतर कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार नसताना केवळ आम्हाला त्रास व्हावा या उद्देश्याने त्याने हा खटाटोप सुरु केला आहे.

      सदर रस्त्याचे काम शासकीय निधीतून केले जात असताना व हा रस्ता गेल्या शंभरावर वर्षापासून निर्विवाद वापरात असताना आताच हरकत, अडथळा निर्माण करण्यामागे या व्यक्तीचा दुष्ट हेतू स्पष्ट होत आहे.

           तरी आमची आपणांस विनंती की, गेल्या शंभरावर वर्षापासून आमच्या वागवहिवाटीचा असलेल्या रस्त्याचे शासकीय निधीतून सुरु असलेले मजबुतीकरण, डांबरीकरणाचे कामास हरकत अडथळा करणाऱ्या सदर श्री. अर्जुन जगन्नाथ नवगिरे या व्यक्तोवर नियमानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करावी. अन्यथा या व्यक्तीच्या या प्रवृत्तीमुळे खरवंडी गावात मोठा सामाजिक उद्रेक उसळू शकतो. तरी आपल्या स्तरावरुन सदर व्यक्तीवर कारवाई होऊन सदर रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्यास आम्ही सर्व शेतकरी आमच्या कुटुंबियांसह दि. २९ मार्च २०२३ रोजी पासून या रस्त्यावरच आमरण उपोषणास बसणार आहोत. यामुळे काही अनुचित गैरप्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी सदर अर्जुन जगन्नाथ नवगिरे यांच्यासह प्रशासनावर राहिल, याची कृपया गांभिर्याने नोंद घ्यावी.अशी माहिती खरवंडी येथील शेतकऱ्यांनी देऊन आज या शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे . या उपोषण साठी शेतकरी, राम कुऱ्हे,भाऊसाहेब कुऱ्हे,संभाजी कुऱ्हे, ज्ञानदेव जाधव, भाऊसाहेब सोनवणे, अवीनाश लवांडे, शाम कुऱ्हे,भरत कुऱ्हे,सुनील भोगे, अशोक कुऱ्हे, अदिनाथ कुऱ्हे, विजय कुऱ्हे ,नितीन कुऱ्हे ,सिद्धार्थ भोगे सहभागी झाले आहेत .