प्रभू श्रीराम नवमी निमित्त सालाबाद प्रमाणे श्रीराम मंदिर यात्रा कमिटी ट्रस्ट श्रीरामपूर या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब (जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री )महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते यात्रेची सुरुवात करण्यात आली .

श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) :-दि.०६/०४/२०२५ प्रभू श्रीराम नवमी निमित्त सालाबाद प्रमाणे श्रीराम मंदिर यात्रा कमिटी ट्रस्ट श्रीरामपूर या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब (जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री )महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते यात्रेची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर ,तालुकाध्यक्ष दीपक पठारे ,शहराध्यक्ष मारुती बिंगले गौतम उपाध्ये, बंडूकुमार शिंदे, प्रकाश चित्ते, शरद नवले पाटील, अभिषेक खंडागळे, बाबासाहेब चिडे ,संदीप चव्हाण, लहू कानडे , मनोज नवले,हंसराज बत्रा, महेश सूळ, आनंद बुधेकर, भैय्या भिसे ,रुपेश हरकल, जितेंद्र छाजेड , महेंद्र पठारे, राहुल पांढरे, विशाल अंभोरे, विजय आखाडे, शंकर मुठे,विठ्ठल राऊत, गणेश राठी,
यावेळी शहरातील विविध भागातील नागरिक व व्यापारी बंधू व भाजपा पदाधिकारी यांनी साहेबांचा सत्कार केला व शहरातल्या समस्या नामदार साहेबांना सांगून श्रीरामपूर शहरांमध्ये लक्ष घालण्यासाठी विनंती केली नितीन दिनकर यांनी केलेल्या कामाचं यावेळी व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी कौतुक केले
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेऊन सर्वांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. गौतम उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले तर बंडूकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले.