नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील वाढदिवस ठरतोय आदर्श गावांचे उदाहरण.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील वाढदिवस ठरतोय आदर्श गावांचे उदाहरण.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष तथा शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी किशोर भाऊ मुंगसे यांच्या वाढदिवसा निमित्ताने अनर्थ खर्च टाळून शाळेसाठी व मंदिरासाठी कचराकुंड्या देण्यात आल्या.

     यावेळी प्रथमतः जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव या ठिकाणी जाऊन कचरा कुंड्या चे वितरण करण्यात आले .नंतर बालाजी देवस्थान ट्रस्ट याठिकाणीही कचरा कुंड्या देण्यात आल्या व किशोर मुंगसे यांचा विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .तसेच जिल्हा परिषद शाळा व बालाजी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने ही सन्मान करण्यात आला.

        यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार बन्सी एडके यांनी वाढ दिवस प्रसंगी सांगितले की प्रत्येक युवक जर खर्चाला फाटा देऊन असा स्तुत्य उपक्रम राबवत असेल तर नक्कीच गावांमध्ये स्वच्छता होण्यास व गावचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. यानंतर शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे पाटील यांनीही शुभेच्छा देत मंदिराची स्वच्छता ही पुण्याचं काम असून निसर्गरम्य वातावरनाला आपण साथ देत आहोत या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले .

    या कार्यक्रमाला प्रगतशील बागातदार शेतकरी चंद्रभान कदम ,देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे मा . चेरमन बाबासाहेब पाटील मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, ज्येष्ठ विश्वस्त रामभाऊ कुटे, नागेबाबा मल्टीस्टेट चे शाखा अधिकारी पांडुरंग एडके ,वसंत मुंगसे, भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष आकाश भाऊ चेडे ,मधुकर भाऊ शिरसागर ,किशोर वांढेकर ,बजरंग दलाचे सदस्य गणेश औटी, गुरुदत्त ट्रांसपोर्टचे अमोल तांबे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान मुंगसे ,असलम पठाण प्रवीण मुंगसे, रमेश संचेती, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर, सहशिक्षक बथूवेल हिवाळे ,सर ,धामणे सर, बाळासाहेब येडे सर, तसेच पत्रकार युनूस पठाण उपस्थित होते .कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे किशोर भाऊ मुंगसे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

.