माहिती अधिकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची व पत्रकारांची सोपान रावडेच्या कुटुंबास भेट,मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी हालचाली सुरू .
नेवासा तालुक्यातील प्रशासनाविरुद्धच्या लढाईत गावगुंडांच्या सहकार्याने ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असलेले सामाजिक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते सोपान रावडे यांच्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे .ग्राम स्तरावरील सरकारी कर्मचारी यांच्या मुख्यालयी राहण्याच्या प्रश्नाबाबत सोपान रावडे यांनी शासनास जाग आणून देण्याचे काम केले .
शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार हे जनतेच्या करातून मिळालेल्या पैशातूनच होत असतात .शासकीय कर्मचारी हे खोटे ठराव देऊन शासनाचीच फसवणूक करतात असे नाही तर ते जनतेची ही फसवणूक करत आहेत .शासनाची कोट्यावधी रुपयांची होणारी फसवणूकही या प्रकरणाने जनतेसमोर उघड झाली आहे.माननीय जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देऊनही याची दखल तालुकास्तरावर कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतले नाही .त्यामुळे आंदोलनाचे स्वरूप बदलत रावडे यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनाची हवा सोडण्याचे आंदोलन सुरू केले .हे आंदोलन दडपण्यासाठी राजकीय व सामाजिक स्तरावर हालचाली सुरू झाल्या .
गावातील शिक्षकांच्या वाहनाची हवा सोडल्यानंतर रावडेंना व त्यांच्या कुटुंबीयांना षड्यंत्र पूर्वक मारहाण करून तसेच त्यांच्यावरच ॲट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करून हे प्रकरण दडपवण्याचे काम केले .अनेक दिवस होऊनही रावडेंना जाणीवपूर्वक जेलची हवा खाण्यास भाग पाडले आहे .
रावडे प्रकरणाकडे लक्ष ठेवून असणारऱ्या कार्यकर्त्यांचा संयम सुटत असल्याचे आता निदर्शनात येत आहे .महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची दखल घेण्यास सुरुवात केली आहे .तसेच या प्रकरणासंबंधी तात्काळ बैठकही आयोजित करण्यात आली आहे .पुढील हालचालींची रूपरेषा या बैठकि दरम्यान ठरवण्यात येणार आहे . महाराष्ट्रात प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावर बैठका घेऊन रावडेंवरील खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी तसेच त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे व गावगुंडांवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे . यासाठी नेवासा तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सोपान रावडे यांच्या कुटुंबास विविध माहिती अधिकार संघटनेतील पदाधिकारी,पत्रकार,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घेतली.त्यांच्या कुटुंबास भेट देण्यासाठी वैजापूर येथील दक्ष पत्रकार संघ जिल्हा संघटक श्री .सचिन मोईन, पत्रकार श्री .बाळासाहेब सरोदे, BPS LIVE NEWS DELHI चे महाराष्ट्र संयोजक , शिवमुद्रा न्युज संपादक तथा अहमदनगर जिल्ह्याचे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णा गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष श्री. सचिन पवार,शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष श्री. त्र्यंबक भदगले तसेच परिसरातील नामवंत कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते .