प्रियांका अरगडे यांना राज्यस्तरीय राजश्री शाहू पुरस्कार जाहीर

प्रियांका अरगडे यांना राज्यस्तरीय राजश्री शाहू पुरस्कार जाहीर

प्रियांका अरगडे यांना राज्यस्तरीय राजश्री शाहू पुरस्कार जाहीर

 

सौंदाळा ता नेवासा येथील लोकनियुक्त सरपंच सौं प्रियांका शरदराव अरगडे यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्यस्तरीय राजश्री शाहू पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कार दि २९/९/२०२३ शुक्रवार रोजी समाज कल्याण मंञी अतुलजी सावे यांंचे हस्ते ज्ञानज्योती साविञीबाई फुले सभागृह गंजपेठ पुणे येथे दिला जाईल अशी माहिती प्रदेश अध्यक्ष राजश्री शाहू प्रतिष्ठान श्री भगवान श्रीमंदीलकर यांनी दिली आहे

 

नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतचे आदर्श काम खालील प्रमाणे आहेत

 

दिपावली निमित्त दरवर्षी सर्व ग्रामस्थांना मोफत साखर वाटप करणारी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत

 

५०% दरात दाढी व कटींग चालवणारी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत

 

सर्व ग्रामस्थांना १ रु किलो प्रमाणे धान्य दळुन दिले जाते

 

सर्व ग्रामस्थांना ५ रु मध्ये २० लिटर थंड व शुध्द पाणी पुरवठा केला जातो

 

नेवासा तालुक्यात लोकसंख्खेनुसार प्रधानमंञी आवास योजनेत सर्वांत जास्त २७६ घरकुल मंजुर केेले

 

रमाईचे ६० घरकुल लाभार्थ्यांना लाभ 

 

सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविले

 

सार्वजनिक ठिकाणी हातधुणे करीता बेसीन बसवले

 

अंगणवाडी व शाळा डिजिटल केल्या

 

रोहयो मध्ये गोटा कॉक्रिट व शेळीनिवारा शेड आणि शोषखड्डयांचा मोठ्या प्रमाणात लाभ

 

जलजीवन मिशन योजनेत १कोटी ३० लाख रु ची पाणी योजना मंजुर ६०% काम पुर्ण

 

महिला सक्षमीकरणासाठी महिला पतसंस्थेची स्थापना

 

महाराष्ट्राची अस्मिता छञपती शिवाजी महाराज स्मारकाची स्थापना

 

अपंगांना रोख स्वरुपात तसेच दरमहिन्यास औषधोपचार करीता निधी दिला जातो

 

कन्यादान योजने अंतर्गत १८ वर्ष पुर्ण असलेल्या मुलीच्या लग्नात संसार उपयोगी वस्तु खरेदी करीता ग्रामपंचायत कडुन रोख ५००० रु चा धनादेश देणारी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत

 

वरील कामाची नोंद घेऊन राज्यस्तरीय राजर्षी शाहु पुरस्कार जाहिर झाला आहे 

हा पुरस्कार जाहिर झाल्याने मा ना शंकरराव गडाख साहेब व मा आ चंद्रशेखर घुले पाटील यांनी अभिनंदन केले आहे