देडगाव येथील पाथर्डी कॅनल मध्ये मानवी मृतदेहाचे सापडलेले तुकडे गंगापुरातील तरुणाचे.
*देडगाव येथील पाथर्डी कॅनॉल मध्ये युवकाच्या मृतदेहाचे तुकडे गंगापुरातील तरुणाचे.*
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे चार दिवसापूर्वी पाथर्डी कॅनॉल मध्ये मानवी जीवाचे तरुणांचे मृतदेहाचे तुकडे सापडले होते.
पोलिसांनी ते तुकडे उत्तरीय तपासणीला पाठवून या घटनेचा तपास वेगाने सुरू केला व त्याचे धागेदोरे थेट गंगापुरात सापडले. असून पोलिसांच्या हाती माहिती आली आहे. देडगाव येथील पोलीस पाटील प्रल्हाद ससाने व सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी खबर दिली होती. त्यानंतर नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकाने गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे भेट दिली असता. मृतदेह कुणाचा आहे निष्पन्न झाल्याचे समजते. आज त्या मृतदेहावरून आई वडील व भावाची डी .एन. ए .तपासणी करणार असून नावासहित निष्पन्न होईल. देडगाव परिसरात उलट सुलट चर्चेला आलेले उधान आता थांबणार आहे. नेवासा पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाला यश आल्याचे समजते आहे.