आमदार कानडेंकडून प्रहार ला सापत्न वागणूक...! प्रहार शांत बसनार्‍यां पैकी नाही - अप्पा साहेब ढुस .

आमदार कानडेंकडून प्रहार ला सापत्न वागणूक...! प्रहार शांत बसनार्‍यां पैकी नाही - अप्पा साहेब ढुस .

*आमदार कानडेंकडून प्रहार ला सापत्न वागणूक..!* *प्रहार शांत बसणाऱ्यांपैकी नाही*- *आप्पासाहेब ढुस* 

देवळाली प्रवरा दि. १३ मार्च 

महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाकडून राज्यातील असंघटित कामगारांना मिळणारे सुरक्षा साहित्य (पेट्या) वाटप करताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार लहुजी कानडे साहेबाना कामगार मंत्री मा. ना. बच्चूभाऊ कडू व त्यांचे प्रहार जनशक्ती पक्षाचे मतदारसंघातील पदाधिकारी यांचा विसर पडल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी नाराजी व्यक्त करून आमदार कानडे साहेबांच्या या कृतीचा त्यांचे स्वीय सहाय्यक यांचेकडे फोनवर निषेध व्यक्त केला आहे. 

       तसेच कामगार मंत्री मा. ना. बच्चूभाऊ कडू यांना प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे साहेब यांचे मार्फत या घटनेची माहिती देणार असल्याचेही ढुस यावेळी म्हणाले. 

       या विषयावर आमचे प्रतिनिधी सोबत बोलताना ढुस म्हणाले की, कामगार विभागाचे वतीने मतदारसंघातील असंघटित कामगारांना वितरित होणारे साहित्य पेट्या थेट आघाडीच्या घटक पक्षातील काँग्रेस चे आमदार लहुजी कानडे साहेब यांचे श्रीरामपूर येथील कार्यालयातून वाटप होताना सोसिएल मीडियावर फोटो पाहायला मिळाले. त्यामध्ये काँग्रेस पक्ष या साहित्याचे वाटप करत आहे असे चित्र दिसते. सध्या राज्यात घटक पक्षांचे आघाडीचे सरकार आहे. या ठिकाणी हे साहित्य वाटप करताना आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित असने अपेक्षित आहे. त्यातल्या त्यात किमान ज्या विभागाच्या वतींने ते साहित्य वितरित होत आहे त्या कामगार मंत्रालयाचे मंत्री असलेल्या मा. ना. बच्चूभाऊ कडू यांचा किमान एक फोटो तरी त्या साहित्य वाटप कार्यक्रम ठिकाणी लावणे अपेक्षित होते. नाही तसे तर किमान बच्चूभाऊ यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या मतदारसंघात असलेल्या पदाधिकाऱ्यांना तरी निमंत्रित करणे आवश्यक होते, परंतु तसे न करता हा काँग्रेस पक्षाचा वैयक्तिक किंवा आमदार निधीतून साहित्य वाटप कार्यक्रम आहे अश्या पद्धतीने आमदार कानडे साहेब साहित्य वाटप करीत आहेत व प्रहार जनशक्ती पक्ष्याला सापत्न वागणूक देत असल्याने आम्ही आमची नाराजी व्यक्त केली असल्याचे ढुस यांनी यावेळी सांगितले. 

     पुढे बोलताना ढुस म्हणाले की, आमची अश्या कार्यक्रमास हरकत असून प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या हस्ते किंवा यांच्या उपस्थितीमध्ये या पेट्यांचे वितरण होणे आवश्यक आहे. 

प्रत्यक्षात पेट्या वाटल्या तरी हरकत नव्हती परंतु कामगार कॅबिनेट मंत्री आणि राज्य मंत्री यांचे फोटो आणि कामगार विभागाचा उल्लेख असणं त्याठिकाणी आवश्यक होतं. मात्र तसे न करता स्वतःच्या नावाने या पेट्या आमदारांनी खपवल्या हे योग्य नाही. हे आमदार प्रहार ला सापत्न वागणूक देतात आणि आमच्याच नेत्याच्या मंत्रालयाच्या पेट्या स्वतःच्या नावाने खपवतात. प्रत्यक्षात या पेटी वाटपाच्या कार्यक्रमाचे ठिकाणी कामगार विभागाच्या विविध कल्याणकारी योजनेचा बॅनर लावून कार्यक्रम केला पाहिजे. आमदारांनी त्यांचा फोटो जरूर छापावा, परंतु त्यासोबत हे विसरू नये की, कामगार विभागाचे नेते जे कोणी असतील त्यांचे फोटो आणि कामगार विभागाचा उल्लेख जरूर त्याठिकाणी असावा. 

      काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरचे काँग्रेस पक्षाचे याच आमदार कानडे साहेबांनी जेंव्हा देवळाली प्रवरा शहराला शासनाच्या निधीतील रुग्णवाहिका दिली तेंव्हा त्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण व पूजन भाजपच्या माजी आमदारांच्या हस्ते केली, तेंव्हा तर त्यांच्याच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आमदारांनी डावलले होते. त्यावेळी देवळाली प्रवरा चे किंवा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गप्प बसले असतील तसे प्रहारचे पदाधिकारी सापत्न वागणूक मिळाल्यावर शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत याची आमदारांनी नोंद घ्यावी असे शेवटी बोलताना ढुस म्हणाले.