अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची किमयाच न्यारी तडीपार गुंडांनाही घडवली जेलची वारी, 4 तरिपार गुंड जेरबंद .
अहमदनगर शहरातील 04 तडीपार गुंडांना स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर
यांचेकडुन अटक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पो.नि. दिनेश आहेर, अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन सदरचे हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे.
नमुद आदेशा प्रमाणे पो .नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पवार, रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, संतोष खैरे, विजय ठोंबरे यांचे पथक नेमुण हद्दपार इसमांना चेक करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
वरील आदेशान्वये पथकाने दिनांक 05/04/24 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील हद्दपार इसमांची माहिती काढुन हद्दपार कालावधीमध्ये बेकायदेशीररित्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये वास्तव्य करणारे खालील आरोपीविरुध्द कारवाई केली आहे.
अ.नं. आरोपीचे नांव दाखल करण्यात आलेला गुन्हा .
1 ) रोहित वसंत फंड वय 29 वर्षे, रा. वंजारगल्ली, घर नं. 1452 साळुंकेवाडा, अहमदनगर तोफखाना पो. स्टे. 440/2024 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे
2 ) मडक्या उर्फ शुभम उर्फ शिवम मारुती धुमाळ वय 23 वर्षे, रा. त्रिमुर्ती चौक, सारसनगर, अहमदनगर भिंगार कॅम्प पोलीस ठाणे 355/2024 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे
3 )नितीन किसन लाड वय 25 वर्षे, रा. भगवानबाबानगर, सारसनगर, अहमदनगर भिंगार कॅम्प पोलीस ठाणे 356/2024महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे
4 )प्रविण विजय मिरपगार वय 23 वर्षे, रा. नागापुर मस्जिद जवळ, नागापुर, अहमदनगर एम.आय.डी.सी. पो. ठाणे गु.र.नं. 345/2024 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत .
आगामी लोकसभा निवडणुक कालावधीमध्ये हद्दपार करण्यात आलेले इसम विनापरवाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये वास्तव्य करतांना आढळुन आल्यास त्यांचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे दिनेश आहेर यांनी कळविले आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, संपतराव भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.