चाईल्ड करीयर इंग्लिश स्कूल सलबतपुर येथिल ज्युनियर कॉलेज च्या संघाने जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत मिळवला द्वितीय क्रमांक.

चाईल्ड करीयर इंग्लिश स्कूल सलबतपुर येथिल ज्युनियर कॉलेज च्या संघाने जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत मिळवला द्वितीय क्रमांक.

*चाईल्ड करीअर ज्युनिअर कॉलेजचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत उपविजेता*

              क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाने शेवगाव येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत सलाबतपुर च्या चाईल्ड करीअर ज्युनिअर कॉलेज च्या 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

          19 वर्ष वयोगटातील मुलींचा अंतिम सामना ज्युनिअर आत्मा मलिक शैक्षणिक संकुल कोकमठाण विरुद्ध चाईल्ड करीअर ज्युनिअर कॉलेज सलाबतपुर यांच्यात झाला. सदर सामन्यात चाईल्ड करीअर ज्युनिअर कॉलेज च्या संघाने उत्तम खेळ करत जिल्ह्यात उपविजेता पद राखले.

             सदर संघात कु. वर्षा शिंदे,प्रांजली शिंदे, नेत्रा पाठक,गीता बोरुडे,रुपाली तांबे,रुपाली चावरे,अमृता नजन,सारिका कोहक,पायल कोहक,आक्सा कादरी, ऐश्वर्या गरड,कोमल दळवी, शितल तांबे,सानिया पठाण, संस्कृती करडक, या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

             सदर खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे सर, शाहरुख सय्यद,विजय खाटीक यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल संघातील खेळाडू चे संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे,विश्वस्त अंबादास गोरे, डॉ.रवींद्र गोरे तसेच ग्रामस्थ,पालक,व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.