टाकळीमिया येथील मिनीनाथ महाराज यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन ;चित्त थरारक शर्यतीमध्ये नाशिक जिल्ह्यातील लक्ष्या, मल्हार ,गुगली पारेगावाला मिळाला प्रथम क्रमांकाचा बहुमान
*टाकळीमिया येथे मिनीनाथ महाराज यात्रेनिमित्त भव्य हिंदकेसरी मैदान उत्साहात*
टाकळीमिया येथे मिनीनाथ महाराज यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य हिंदकेसरी बैलगाडा मैदान मोठ्या उत्साहात आणि शिस्तीत पार पडले. या मैदानाचे मानकरी नाशिक जिल्ह्यातील पारेगाव येथील लक्षा, मल्हार आणि गुगली हे ठरले.
या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील पारेगाव, वणी-दिंडोरी, देवरगाव, नेवरगाव तसेच राहुरी तालुक्यातील नामांकित बैलगाडा शर्यतीतील गाड्यांनी सहभाग घेतला. शेकडो किलोमीटर अंतरावरून बैलगाडा प्रेमींनी आपली जनावरे घेऊन उपस्थित राहत खेळात रंगत आणली. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातून सुमारे 200 किलोमीटर अंतर पार करूनही अनेक मोठ्या गाड्या मैदानात दाखल झाल्या.
या स्पर्धेत सर्वोत्तम गाडीचा मान पारेगाव (ता. नाशिक) येथील दीपक भाऊ खरे यांच्या गाडीला मिळाला. या गाडीचे चालक नवनाथ ( मामा ) हिरे (निफाड) असून महेंद्र खरे व जितेंद्र खरे ,आयुष देवेंद्र शिंदे , डॉ देवेंद्र शिंदे ,अशोक गाडेकर , ज्ञानेश्वर हेंडगे ,दत्तू गोडसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अंतिम फेरीत या गाडीने राहुरी तालुक्यातील ब्रा

ह्मणी येथील रवी हापसे शेंड्या यांच्या गाडीशी चुरशीची लढत दिली.
मैदानातील थरारक शर्यतींनी प्रेक्षकांचे डोळे दिपवले. उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रमात कुठेही गालबोट लागले नाही. यात्रा समितीने सर्व गाडीमालकांचे स्वागत करून बक्षिसे देत त्यांचा गौरव केला.
एकूणच, उत्तम नियोजन, खेळातील चुरस आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हिंदकेसरी मैदान यशस्वी ठरले असून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे








