काय रस्ता,काय खड्डे, काय भेगा या बातमीची दखल घेऊन शनिशिंगणापूर रस्ता दुरुस्तीचे काम अखेर सुरू. ठेकेदाराविषयी प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण .
काय रस्ता,काय खड्डे , काय भेगा सगळं काम कसं निकृष्टच अशा आशयाची बातमी काही दिवसापूर्वी BPS LIVE NEWS DELHI ने प्रकाशित केली होती .या बातमीची उशिरा का होईना दखल घेत संबंधित ठेकेदाराने या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे .नगर मनमाड हायवे ते शनिशिंगणापूर या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करून हा नविन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता .परंतु कमी कालावधीतच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात छोटी मोठी खड्डे तसेच रस्त्यावर चिरा पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते .सध्या रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .
नगर मनमाड हायवे ते शनिशिंगणापूर दरम्यान अजूनही बरीच कामे अपूर्ण स्थितीत आहेत .इस्टिमेट नुसार या रस्त्याचे काम झाले किंवा नाही हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासून पहावे व राहिलेले अपूर्ण काम लवकरात लवकर मार्गी लावावे तसेच रस्ता रुंदीकरणामुळे व्यावसायिक व काही नागरिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण काढून रहदारिस होणारा अडथळा दूर करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .