शहापूर गावचे भूमिपुत्र श्रीधर जगन्नाथ कोलते जाण्याने कोलते कुटुंबाचा आधारवड हरपला.
नेवासा तालुक्यातील शहापूर गावातील प्रगतशील बागातदार शेतकरी श्रीधर जगन्नाथ कोलते यांचे नुकतेच निधन झाले असून, कोलते कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अतिशय गरिबीतून प्रपंच फुलवला प्रपंच एक चांगल्या स्तरावर आणून ठेवला .परंतु काही गोष्टी नियतीला मान्य नव्हत्या म्हणून त्यांच्यावर काळाने घाला घातला व त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी त्याचे वय ७५ वर्ष होते.त्यांच्या जाण्याने कोलते कुटुंबाचा आधारवड हरपला. ते शहापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे ते माजी सेक्रेटरी होते. त्यांच्या जाण्याने शहापूर ,देवगाव ,देडगाव व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहीण ,मुलगा, मुलगी , जावई , सुना नातवंड ,पुतणे असा मोठा परिवार आहे.
ते प्रगतशील शेतकरी दत्तात्रय कोलते यांचे वडिल होते.
टीप - मंगळवार दि.१८ / १० / २०२२ रोजी सकाळी ९:०० वा. कायगाव टोका (प्रवरा संगम) येथे दशक्रिया विधी होइल.