तांभेरे येथील निळा झेंडा प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना म्हणणे सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश --

तांभेरे येथील निळा झेंडा प्रकरणी  पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना म्हणणे सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश --

 राहूरी पोलिसांच्या विरोधात तांभेरे येथील निळा झेंडा लावल्या प्रकरणी खोटी व बनावट फिर्याद घेवून बेकायदेशीर डांबून ठेवल्या प्रकरणी तांभेरे येथील आंबेडकरी मागासवर्गीयांनी अशोक तांबे व इतरा मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या क्रिमीनल ॲप्लीकेशन संदर्भात म्हणणे सादर करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व इतर यांना हायकोर्टाचे न्या. श्रीमती विभा कणकणवाडी व न्या.राजेश एस पाटील यांनी दिले आहे. 

न्यायालयाच्या या आदेशामुळे खळबळ उडाली असुन सदर घटने विषयी जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या विषयी सविस्तर माहिती अशी की राहूरी पोलीसांनी तांभेरे येथील निळा झेंडा लावल्या प्रकरणी साध्या कागदावरील खोटी व बनावट कपोलकल्पीत फिर्याद दाखल करून घेवून एकोणीस महिलांना व चौदा पुरुष मागासवर्गीयांना बेकायदेशीर अटक करून डांबून ठेवले होते. व चौदा पुरुषांना एफ आय आर दाखल नसताना साध्या कागदावरील फिर्यादी वर मा.न्यायालयाची दिशाभूल फसवणूक व विश्वासघात करून दोन वेळा पोलीस रिमांड घेवून बेकायदेशीर जेलमध्ये डांबून ठेवले या प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख राजू आढाव यांनी व आरोपींचे वकील ॲड.सुरेश तांबे यांनी सर्व कागदपत्रे काढून घेवून गेली चार पाच महिने पाठपुरावा करून अन्यायग्रस्त आंबेडकरी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अशोक तांबे व इतरांना घेवून औरंगाबाद खंडपीठात ॲड.राहूल जोशी यांचे मार्फत क्रिमीनल अप्लीकेशन नं 2647 /2022 नुसार अर्ज दाखल केला आहे 

यासंदर्भात मा.न्यायालयाने पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे फिर्यादी ज्ञानदेव नारायण गर्जे व ग्रामसेविका सोनाली भाऊसाहेब पाटोळे यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश वरील न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी या प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख राजू आढाव यांनी वरिष्ठांकडे संघटनेच्या वतीने तक्रार करून आंदोलनही केले. याची दखल घेऊन मा.पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी मा.अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले असतानाच औरंगाबाद हायकोर्टाने राहुरी पोलीसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात पोलीस वर्तुळातसह जनतेमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे या बाबत पोलीस अधिक्षक व पोलीस महानिरीक्षक नाशिक हे काय निर्णय घेतात या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या संबंधी अर्जदार यांच्या वतीने ॲड.राहुल जोशी व सरकारच्या वतीने ॲड. बी.व्ही.विरधे यांनी काम पाहिले.