अल्पवयीन मुलीचा पाठलाग व विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस सक्त मजुरी व दंडाची शिक्षा.

अल्पवयीन मुलीचा पाठलाग व विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस  सक्त मजुरी व दंडाची शिक्षा.

 अहमदनगर : आरोपी नामे राकेश मल्लेशाम बेत्ती , वय - ३ ९ वर्षे , रा . शिवाजीनगर , कल्याणरोड , भावनाऋषी सोसायटी , अहमदनगर याने पिडीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीस भा.दं.वि. कलम ३५४ , ३५४ ( ए ) , ( डी ) व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ११ व १२ नुसार दोषी धरून आरोपीस १ वर्षे सक्त मजुरी व रुपये ३,००० / - रूपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची

 थोडक्यात हकीगत की , दिनांक ०७.०२.२०२० रोजी अल्पवयीन पिडीत मुलगी ही कॉलेजमधून घरी येत असताना , दुपारी ३ चे सुमारास आरोपी पिडीत मुलीचा पाठलाग करीत मागे आला व तिला म्हणाला की , माझे सोबत चल मी तुला फिरायला घेवून जातो , तुला जे पाहिजे असेल ते घेवून देतो असे बोलून आरोपीने पिडीत मुलीकडे एक चिट्ठी फेकली . ती चिठठी पिडीत मुलीने घेतली नाही व आरोपीस म्हणाली की , माझा पाठलाग करू नको " त्यानंतर आरोपी हा पिडीतेस म्हणाला की , " मी कुणाच्या ● बापाला घाबरत नाही , तुला काय करावयाचे ते कर " असे म्हणून तिचा हात पकडला व तिचा विनयभंग केला . सदर कृत्यामुळे पिडीता ही घाबरली व आरोपीच्या हाताला छटका देवून तिच्या घरी पळत गेली . घरी गेल्यानंतर सदरची घटना पिडीतेने तिचे मामा , मामेभाऊ , आई यांना सांगितली . त्यानंतर दुस - या दिवशी पिडीतेचा मामेभाऊ व मामा यांनी आरोपीवर पाळत ठेवून आरोपीस पिडीतेचा पाठलाग करत असताना पकडले . आरोपीस पकडल्यानंतर त्याला तोफखाना पोलिस स्टेशनला घेवून जाण्यात आले . तेथे गेल्यानंतर पिडीतेने आरोपीविरुध्द फिर्याद दिली . सदर घटनेचा तपास पो.उप.निरीक्षक . के.बी. घायवट यांनी करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पिडीत मुलीचा मामेभाऊ , पंच साक्षीदार तपासी अधिकारी , क्यासंदर्भात हिंद सेवा मंडळाची प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व अकोले पंचायत समितीचे अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . तसेच आलेला पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ मॅडम यांनी सहकार्य केले . 

अहमदनगर 

ता . ०५/१०/२०२३

 (ॲड. मनिषा पी . केळगंद्रे शिंदे )

 विशेष सरकारी वकील 

अहमदनगर . 

मो . ९ ८५०८६०४११,

८२०८ ९९ ६७ ९ ५