श्रीरामपुरात भाजपच्या भिकारी चंद्रकांत पाटलाचा जोरदार निषेध

श्रीरामपुरात भाजपच्या भिकारी चंद्रकांत पाटलाचा जोरदार निषेध श्रीरामपूर : कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करून महापुरुषांचा अपमान करून त्यांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलाचा श्रीरामपुरात विविध पक्ष, संघटनांच्या वतीने जोरदार निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. भाजपाच्या पिलावळीनी गरळ ओकून महापुरुषांचा अपमान केला. त्यांना देणगी, दान, भीक यातला फरक कळत नाही, अशा भिकारी चंद्रकांत पाटलाचा निषेध करत असल्याचे यावेळी पदाधिकारी म्हणाले. शहरातील गांधी चौकात मंगळवारी (दि.१३) भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भिम पँथर, एकलव्य भिल्ल संघटना, भिम गर्जना, विद्रोही संघटना आदींच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपातील वाचाळवीर चंद्रकांत पाटलाचा निषेध केला. "चंद्रकांत पाटलाचा धिक्कार असो", "चंद्रकांत पाटलाचे करायचं काय खाली डोकं वर पाय", अशा घोषणा देण्यात आल्या. आर एम धनवडे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांना शिक्षण खुले केले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितले होते की, माझ्या दाढीला जेवढे केस आहेत, तेवढे बहुजनांचे विद्यार्थी मी घडवून तयार करणार आहे. त्यासाठी त्यांनी लोकांकडून देणगी, दान घेतले.दिवसरात्र फिरले. स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातले मंगळसूत्र गहाण ठेऊन खर्च केला. मुलांना उपाशी राहू दिले नाही.त्यांनी भीक मागितलेली नाही. महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला शिकवून गोरगरीब, शूद्र, बहुजनांसाठी भारतातील पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे १८४८ साली सुरु केली. त्यामुळे महिला उच्च पदावर पोहोचल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थपना करून अनेक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित केले. भारतीय संविधानात मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली असल्याचेही ते म्हणाले. यावेळी अशोक अंगारखे, संजय वाव्हळ, शिवाजी गांगुर्डे, आर एम धनवडे, फ्रासिस शेळके, चौदंते सर, संतोष त्रिभुवन, संतोष मोकळ, राज खान, अमोल सोनवणे, फोरोज शेख, राजेश बोरुडे, रत्नाकर वादे, मुश्ताकभाई, नंदू कदम आदी उपस्थित होते.

श्रीरामपुरात भाजपच्या भिकारी चंद्रकांत पाटलाचा जोरदार निषेध