कामगार कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करणे म्हणजेच ईश्वर सेवा अँड.डॉ. शिवाजीराव काकडे साहेब.
कामगार कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करणे म्हणजेच ईश्वर सेवा - अँड.डॉ.शिवाजीराव काकडे साहेब.
भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी,
आव्हाणे बु: आज दि.३ रोजी जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने तालुक्यातील असंघटीत बांधकाम कामगारांचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु शासनाचे प्रतिबंधात्मक आदेशामुळे मोर्चाऐवजी श्रमिकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जनशक्तीचे जगन्नाथ गावडे, आबासाहेब काकडे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, भारत लांडे, संजय दुधाडे, अकबर शेख, माणिक गर्जे, रज्जाक शेख, कॉ.राम पोटफोडे, राजेंद्र लोणकर, अशोक ढाकणे, रघुनाथ सातपुते, सखाराम घावटे, कारभारी मरकड, सुनील गवळी, मनोज घोंगडे, भाऊसाहेब राजळे, लक्ष्मण पातकळ, नवनाथ खेडकर, वसंत वाघ, भारत भालेराव, बाबासाहेब म्हस्के, सत्यभामा जाधव, सुलभा उगले, अलका परदेशी, मीराताई गडाख, सुनंदा पवार, राणी सागडे, सुवर्णा दराडे, रूपाली उबाळे आदि यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी अध्यक्ष पदावरून पुढे बोलतांना काकडे म्हणाले की, जिल्हा परिषद सारखे छोटे पद असतांना देखील तालुक्यात इतिहास घडविला आहे. कामगारांच्या न्याय, हक्कासाठी आपण भांडतो हे ओळखून आज आपण आला आहात. आमची बांधीलकी कामगारांशी आहे. जनशक्ती नेहमी असंघटीत कामगार, कष्टकरी, शेतकर्यांसाठी काम करत आली आहे. बांधकाम कामगारांची तालुक्यातील संख्या पाहून त्यांच्यासाठी श्रमिक संघाची स्थापना केली. बांधकाम कामगारांच्या नवीन नोंदणी, नूतनीकरण, असंख्य समस्या, त्यांचे विविध योजना कामगारापर्यंत पोहोचण्यासाठी काम सुरू केले. आज रोजी श्रमिक संघामध्ये ५ हजारांहून अधिक सभासदांची नोंदणी झालेली आहे. यावेळी अॅड.काकडे यांनी बांधकाम कामगारांच्या २८ योजना सर्व कामगारांना समजावून सांगितल्या व यापुढे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले.
यावेळी श्रमिक संघाचे अध्यक्ष संजय दुधाडे, जगन्नाथ गावडे, विष्णू दिवटे, नवनाथ खेडकर, माणिक गर्जे, कारभारी मरकड, अलका परदेशी यांची भाषणे झाली. यावेळी जनशक्तीच्या नूतन संचालक मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी भिवसेन केदार, पांडुरंग गरड, चंद्रकांत गाढे, जनार्धन वाबळे, विनोद पवार, सुखदेव जाधव, अशोक मुरदारे, अशोक म्हस्के, माऊली धनवडे, विश्वास ढाकणे, भागचंद कुंडकर, पांडुरंग जाधव, रोहिदास पातकळ, तुळसीराम रुईकर, शिवाजी औटी, भिका फलके, शेषराव फलके, मुरलीधर आर्ले, बाळासाहेब जाधव आदिसह असंख्य कामगार यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र फलके यांनी प्रास्ताविक संजय दुधाडे तर आभार प्रा.सखाराम घावटे यांनी
मानले.