अधिक मास संकष्ट चतुर्थी निमित्त आव्हाने गणपती येथे धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न.
आधिक मास संकष्टी चतुर्थी निमित्त आव्हणे गणपती येथे धार्मिक कार्यक्रम.
भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी,
आव्हाणे बु :शेवगाव तालुक्यातील गणपती आव्हणे येथे दि.4 ऑगस्ट रोजी आधिक मास संकष्टी चतुर्थी निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी सात वाजता गंगास्थान,श्रीची आरती व महाभिषेक प्रा.मालोजीराव भुसारी,श्री अंकुशराव कळमकर,श्री वसंतराव बळवंत देवधर साहेब शेवगाव यांच्या हस्ते होईल.तसेच सकाळी साडेनऊ वाजता ह.भ.प.डॉ हरिदास महाराज पालवे शास्त्री,श्री वृद्धेश्वर गुरुकुल आळंदी यांचे जाहीर हरिकीर्तनचा कार्यक्रम होईल.तसेच दुपारी 12 वा.भाविकांना फराळाची व्यवस्था श्री वसंतराव बळवंत देवधर साहेब शेवगाव याच्या वतीने करण्यात आली आहे.सायंकाळी 6वा.ह.भ.प.गणेश महाराज डोंगरे यांचे जाहीर प्रवचन होईल,त्यानंतर सायं.सात वाजता श्रीची आरती व महाभिषेक श्री लक्ष्मणराव भगवानराव बोरुडे याच्या हस्ते होईल.रात्री 8.30 वा.महाप्रसादाची व्यवस्था दाते श्री लक्ष्मणराव भगवान बोरुडे यांच्याकडुन करण्यात आली आहे.त्यानंतर रात्री दहा वाजता दादोबा देव एकतारी भजनी मंडळ आव्हाणे परिसर यांचा जागराचा कार्यक्रम होईल,त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री स्वयंभु निद्रिस्त गणपती मंदिर आव्हाणे बु ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.मालोजीराव भुसारी,सरचिटणीस अर्जुनराव सरपते,माजी विश्वस्त अंकुश कळमकर,रामदास दिवटे,कारभारी तळेकर,सुधाकर चोथे,नारायण जाधव,वसंत भालेराव,सचिव लक्ष्मण मुटकुळे यांनी केले आहे.