नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे हनुमान मंदीरात १० एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात.
बालाजी देडगाव( प्रतिनीधी)
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ह भ प शांतीब्रम्ह भास्करगिरी जी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह-भ-प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली हनुमान जन्मोत्सव निमित्तानं दरवर्षीप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन बजरंग दल, भजनी मंडळ व देडगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सप्ताहानिमित्त संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन चरित्र कथा होणार आहे. हा कार्यक्रम हनुमान मंदिरा च्या प्रारंगणात होणारं आहे. ही सेवा ह भ प लक्ष्मण महाराज शास्त्री आळंदी देवाची यांच्या मधूर वाणीतून पार पडणार आहे.
सप्ताहाची सुरुवात १० एप्रिल पासून ते १७ एप्रिल पर्यंत राहणार आहे. १० एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव दीन निमीत्त सकाळी ९ ते ११वाजता व हनुमान जन्मोत्सव १६ एप्रील या दिवशी पहाटे ४ते ६ ह-भ-प सुखदेव महाराज मुंगसे यांचे जय हरी किर्तन होईल. व १७ रोजी काल्याचे किर्तन ह भ प लक्ष्मण महाराज शास्त्री यांचे होईल.
दरवर्षी प्रमाणे काकडा आरती, जागर, हरिपाठ, जेवणाच्या पंगती वेळेवर होतील याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. आशी माहिती ह-भ-प सुखदेव महाराज मुंगसे यांनी दिली.