शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठाचे प्रसारित तंत्रज्ञान आत्मसात करावे - पाणी व्यवस्थापन तज्ञ श्री . उरी रुबीनस्टन
*शेतकर्यांनी कृषि विद्यापीठाचे प्रसारित तंत्रज्ञान आत्मसात करावे*
*- पाणी व्यवस्थापन तज्ञ श्री. उरी रुबीनस्टन*
*राहुरी विद्यापीठ, दि. 30 ऑगस्ट, 2024*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डाळिंब गुणवत्ता केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावरील हवामानावर आधारित ठिबक सिंचन पद्धतीचे डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी अनुकरण करून डाळिंब बागेत पाण्याचे काटेकोर नियोजन करावे असे आवाहन माशाव एम्बसी ऑफ इस्त्राईल येथील ऍग्रीकल्चर अटॅचीचे डाळिंब शेतीतील पाणी व्यवस्थापन तज्ञ श्री. उरी रुबीनस्टन यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डाळिंब गुणवत्ता केंद्रास त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील, पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापक सौ. पल्लवी देवरे, श्रीरामपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री. अमोल काळे, उद्यानविद्यावेता डॉ. सुभाष गायकवाड, कीटकशास्त्रज्ञ डॉ. अशोक वाळुंज व वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे यावेळी उपस्थित होते. सदर भेटीदरम्यान श्री. उरी रुबीनस्टन यांनी राहुरी तालुक्यातील वरवंडी गावातील डाळिंब बागांची पाहणी करून उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषि विद्यापीठाचे संपर्क शेतकरी श्री. बाळासाहेब कोंडीराम अडसुरे यांची डाळिंब बाग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. श्री. अडसुरे यांच्याप्रमाणेच इतर सर्व शेतकर्यांनी कृषि विद्यापीठाचे प्रसारित तंत्रज्ञान आत्मसात करून डाळिंब शेती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीच्या वेळी राहुरी कृषि विभागाचे कृषि सहाय्यक श्री. चंद्रकांत म्हसे, अ.भा.स. कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्पाचे कृषि सहाय्यक श्री. दत्तात्रय गायकवाड, श्री. महेश ढगे, श्री. राहुल अडसुरे, श्री. विजय अडसुरे, श्री. सतीश अडसुरे, श्री. दिलीप अडसुरे, श्री. सुनील अडसुरे, श्री. कमलभाई शेख आदी शेतकरी उपस्थित होते.