उपऱ्या उमेदवाराने मुंगी गटात -गणात उमेदवारी करू नये:- नवनाथ ईसारवाडे

उपऱ्या उमेदवाराने मुंगी गटात -गणात उमेदवारी करू नये:- नवनाथ ईसारवाडे

उपऱ्या उमेदवाराने मुंगी गटात-गणात उमेदवारी करू नये :- नवनाथराव इसरवाडे

शेवगाव प्रतिनिधी:-यशवंत पाटेकर

शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मुंगी गट व गणा मध्ये तसेच चापडगाव गणामध्ये आयत्या ( उपऱ्या ) उमेदवाराने निवडणूक लढविण्यासाठी लुडभुड करू नये. तसेच उमेदवाराने स्वतःचा गट व गण सोडून इतर गट व गणात फिरून केविलवाना श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे साहेब यांचे खंदे समर्थक तथा शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी पत्रकारांना दिलेल्या एका प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिली आहे. सदरील पत्रकार यांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंगी व चापडगाव गट तसेच गणा मध्ये शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांचे मोठे योगदान असून त्यांनी या भागातील खेड्या-पाड्यात तसेच वाड्या;वस्त्यांमध्ये लाखो रुपयांचा निधी देऊन शाळकरी विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्यासाठी गाव अंतर्गत रस्ते वाड्या-वस्त्या वरील रस्ते निर्माण केले आहे. त्यामुळे या भागात उपऱ्या उमेदवारीने आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तसेच आपण ज्या गटात-गणात कामे केली आहे. त्याच गटात गणात निवडणूक लढवावी. तसेच आपले राजकीय अस्तित्व झाकून ठेवण्यासाठी इतर गटात व गणात लुडभुड करून लोकांमध्ये तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये. अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी पत्रकारांना दिलेल्या एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.