भारतीय पत्रकार संघटनेचे मीडिया अध्यक्ष मा. अधिकराव चनै व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची मागणी.

भारतीय पत्रकार संघटनेचे मीडिया अध्यक्ष मा. अधिकराव चनै व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची मागणी.

सांगली प्रतिनिधी:-मीडिया अध्यक्ष बी पी एस न्यूज महाराष्ट्र राज्य.

कडेगांव नगरपंचायत कडेगाव जिल्हा सांगली येथे नगरपंचायत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा उभारला जावा. कडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नाही महाराष्ट्रात सर्व नगरपंचायतीच्या हद्दीत पुतळा आहे केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून निधी मिळावा यासंदर्भात सरकारला विनंती अर्ज पाठविण्यात आला आहे.

कडेगाव नगरपंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी लेखी ठराव झाल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. 285 पलूस -कडेगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार कृषी राज्य मंत्री विधानसभा - विधान परिषद यांच्या आमदार फंडातून तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून निधी मिळावा. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी तसेच कडेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या देखरेखीत काम व्हावे पुतळा उभारणीचे काम आवे असे अर्जात नमूद करण्यात आलेले आहे.

कडेगाव हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक आहे येथील रामनवमी, गोविंद गिरी यात्रा ,भैरवनाथ यात्रा, खंडोबाची यात्रा व मोहरम मुळे कडेगाव ख्याती दूरपर्यंत पसरली आहे. आदरणीय स्वर्गीय डॉ पतंगराव कदम यांनी या कडेगांव शहराचा सर्वांगीण विकास केला यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत येथील कडेगांव शहरात विकास कामे करीत आहेत. साहेबांचे चिरंजीव मा आमदार डॉ विश्वजीत कदम कृषी सहकार राज्यमंत्री यांनी कडेगांव शहरात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लागेल ती मदत केली आहे. तसेच कडेगांव येथिल मुस्लिम समाजातील सभागृह करीता 30 लाख व मुस्लिम दफनभूमीसाठी 20 लाख असे मिळून 50 लाखाचा निधी मंजूर केला आहे कडेगांव सर्वागीण विकासासाठी कोठयावधी रूपयाचा निधी दिला आहे .तसेच मा संग्राम भाऊ देशमुख माजी अध्यक्ष जिल्हापरिषद सांगली यांनी ही कडेगांव शहर पलुस कडेगांव तालुका सर्वागीण विकासासाठी कोठयावधी रूपयाचा निधी दिला 

आहे .

तसेच पलुस -कडेगांव मतदार संघात पुणे पदविधर मतदार संघाचे विधानपरिषद आमदार अरूण अण्णा लाड यांनी ही पलुस कडेगांव तालुका सर्वागीण विकासासाठी कोठयावधी रूपयाचा निधी दिला आहे 

तरी कडेगांव नगरपंचायत हद्दीत 15 फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी साठी निधी देण्यात यावा अशी मी कडेगांव नागरिक यांच्या वतीने विनंती करतो 

     सदरील कामाचा लवकरात लवकर पाठपुरावा व्हावा यासाठी विनंती अर्ज म्हणून

1)मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब

2) मा. कृषि व राज्य मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम

3)माननीय आमदारअरुण अण्णा लाड

4) माननीय संग्राम भाऊ देशमुख माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली

4) कडेगाव नगरपंचायत

यांना देण्यात आलेला आहे.