उद्या बालाजी देडगाव नगरी मध्ये शिवजंतीनिमित्त धडकणार भगवे वादळ.

उद्या बालाजी देडगाव नगरी मध्ये शिवजंतीनिमित्त धडकणार भगवे वादळ.

बालाजी देडगाव (प्रतिनीधी) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती यांची उद्या तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी होणार आहे. त्या निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमांनी हा सोहळा संपन्न होणार आहे.

     उद्या सकाळी ठीक ९. वाजता दत्त मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून अनेक मान्यवर, वक्ते त्या ठिकाणी शिवचरित्र सादर करणार आहे .मोठ्या थाटामाटात शिवजयंतीचा उत्साह हा उद्या पार पडणार आहे.

       ज्यांनी अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या भगव्या वादळाची आपण वाट पाहत होतो ती शिवमय पहाट उद्या उजेडणार आहे. या जगात छत्रपती शिवरायांचा एकही मंदिर नसुन सर्व अखंड हिंदुस्थान च्या शिवप्रेमींच्या मनात छत्रपती शिवरायांचा वास , वावर आहे. या पराक्रमी राज्याचा उद्या शिवजन्मोत्सव सोहळा उद्या बालाजीच्या पुण्यपावन भूमीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

    सायंकाळी पाच ते सात यादरम्यान छत्रपती शिवरायांची भगव्या वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांच्या गर्जनांनी देडगाव नगरी उद्या गजबजून जाणार आहे तरी सर्व देडगाव समस्त, ग्रामस्थ,शिवप्रेमी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे

.