येलवाडी गावात पारंपारिक खेळानुसार साजरी केली शिवजयंती
-खेड तालुक्यातील येलवाडी गावात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली दोन वर्षे कोरोना मुळे शिवजयंती साजरी करता आली नाही त्यामुळे यावर्षी शिवजयंती साजरी करण्या साठी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला.विशेष म्हणजे या वर्षी शिवजयंती ही पूर्ण पणे पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने दांड पट्टा,मल्ल खांब,ठोल ताशा,भजन,रस्सी खेळ,असे अनेक खेळ करत ही शिवजयंती साजरी झाली.विशेष म्हणजे एक गाव शिवजयंती च्या माध्यमातून ही जयंती साजरी झाली.गावातील सर्व तरुण,महिला, तसेच वृद्धापर्यंत सर्व या कार्यक्रमात सहभागी झाले होते.पंचक्रोशीत एक आकर्षक शिवजयंती म्हणून सर्वजण येलवाडी गावातील ग्रामस्थांचे कौतुक करत आहे.