बहिणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी 16,18,900/- रु . किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आरोपीच्या मुसक्या .
एम.आय.डी.सी. परिसरामध्ये बहीणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी 16,18,900/- रुपये किमतीचे मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई .
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी नामे सुजय सुनिल गांधी वय 33 वर्षे, व्यवसाय -किराणा दुकान, रा. माताजी नगर, जिमखाना, एम.आय.डी.सी., ता. जि. अहमदनगर हे दिनांक 30/12/2023 रोजी रात्री 08.00 वा. चे सुमारास त्यांचे नातेवाईकाचे लग्न समारंभाचे कार्यक्रमाकरिता बुरुडगांव रोड या ठिकाणी गेले व रात्री 11.00 वा. चे सुमारास परत घरी आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे बंद घराचे दरवाजाचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन 2,50,000/- रुपये रोख रक्कम व 4,80,000/- रुपये किमतीचे 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 3000/- रुपये किमतीची लोखंडी तिजोरी असा एकुण 7,33,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला आहे. सदर घटनेबाबत एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.र.नं. 1196/2023 भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अहमदनगर शहरामध्ये बंद घराचे घरफोडीच्या नेहमी घटना घटत असल्याने राकेश ओला , पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/ दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोहेकॉ/संदीप पवार, पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, विजय ठोंबरे, सचिन अडबल, संतोष लोढे, संतोष खैरे, पोकॉ/रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, अमृत आढाव, आकाश काळे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, व चापोकॉ/अरुण मोरे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
स्थागुशा चे वरील पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले असता फिर्यादीचे घरासमोर एक इसम मोपेड गाडीवरुन आल्याचे दिसुन आले. पोलीस पथक गुप्त बातमीदारामार्फत तसेच अहमदनगर शहरातील पतसंस्था, गोल्ड लोन देणारे व्यवसायीक, फायनान्स कंपनी यांचेकडे गहाण ठेवलेल्या सोन्याची माहिती घेत असतांना पोनि दिनेश आहेर, स्था.गु.शा. अहमदनगर यांना फिर्यादीचा मेव्हणा सुरज प्रकाश लोढा याने मुथुट फायनान्स कंपनीमध्ये काही सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक सुरज लोढा याची माहिती घेत असतांना त्याच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्याने पोलीस पथकाने दिनांक 03/01/2023 रोजी सुरज प्रकाश लोढा वय 29 वर्षे, रा. सावली सोसायटी, भुषणनगर, अहमदनगर यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन दिनांक 30/12/2023 रोजी आरोपी यास त्याची बहीण व मेव्हणा असे लग्न समारंभाकरीता बुरुडगांव रोड, अहमदनगर येथे जाणार असल्याची माहिती असल्याने त्याने त्यांचे घराजवळ पाळत ठेवुन बहीण व मेव्हणा लग्नाकरीता निघुन गेल्याने व घरी कोणी नसल्याची खात्री झाल्यानंतर घराचे कुलुप तोडुन शोकेसमधील सोने व रोख रक्कम ठेवलेली तिजोरीची चोरी केली असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी सुरज प्रकाश लोढा वय 29 वर्षे, रा. सावली सोसायटी, भुषणनगर, अहमदनगर याचेकडुन त्याने चोरी केलेले 13,26,400/- रुपये किमतीचे 221 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2,04,500/- रुपये रोख रक्कम, तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेले 16,000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल, 70,000/- रुपये किमतीची मोटारसायकल, 2000/- रुपये किमतीचे तिजोरी कापण्यासाठी वापरलेले ग्राइंडर असा एकुण 16,18,900/- रुपये किमतीचा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 04 सोन्याच्या बांगड्या मुथुट फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवले असल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासकामी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व संपत भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.