शासकिय वाळूची चोरी करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,15,60,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त .
शेवगांव तालुक्यातील मुंगी व हादगाव दोन ठिकाणी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची शासकीय वाळूची चोरून वाहतूक करणाऱ्या एक डंपर व एक ट्रॅक्टर वर कारवाई.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत वाळू सह १५,६०,००० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात .
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शेवगांव पोस्टे हद्दीत अवैध वाळु वाहतुकी बाबत गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, त्रिंबक रक्टे हा त्याच्या हस्तकामार्फत एमएच-१६ बी वाय-६१५९ क्रमांक असलेल्या लाल रंगाच्या स्वराज ट्रैक्टर व लाल रंगाच्या दृचाकी ढपींग ट्रॉलोमधून मूंगी ता. शेवगांव, जि. अ.नगर येथे शासकिय वाळु चोरुन वाहतुक करत आहे . आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेड केली असता ०९/३० वा. 'सुमारास नमूद ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर रोडच्या कडेला थांबविला .
ट्रैक्टर चालकास वाळू वाहतूक करण्याचा परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याने परवाना नसलेबाबत कळविले नमूद ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) शत्रुघ्न रोहीदास मोटकर वय-२३ रा. मुंगी ता. शेवगांव जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले सदर ट्रैक्टर चालकास ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचा आहे याबाबत विचारपूस केली असता त्याने सदर ट्रॅक्टरचा मालक २) त्रिंबक रक्टे रा. मुंगी ता. शेवगांव (पूर्ण नाव कलम माहिती नाही) (फरार) हा असून त्याचे सांगणेबरून त्याचे आर्थीक फायद्याकरीता शासकीय वाळू चोहनी ला कांत (पूर्ण नाब . माहतुको सदर ट्रॅक्टरवरील चालक मालक यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे शासकिय वाळु चोरुन वाहतूक करर्ताना मिळुन आले आहे. सदर ट्रॅक्टरमधील शासकिय वाळुची पाहणी करता त्याचे वर्णन पुढिल प्रमाणे आहे .१) ५,०००००/- रु कि, एक स्वराज कंपनीचा लाल रंगाचा टॅक्टर त्याचा क्रमांक एमएच-१६ बीवाय-६१५९ त्यास विनाक्रमांकाची दूचाकी हंपींग ट्रॉली लाल रंगाची जु बाकि अंदाजे २) २०,०००/- रू.कि.ची दोन ब्रास शासकीय वाळू ढंपींग ट्रॉली मध्ये किं. अंदाजे ५,२०,०००/- एकुण किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर ट्रैक्टर व ढंपींग ट्रॉली व शासकिय वाळु मुद्देमाल जागीच जप्त करुन ताब्यात घेवुन मुद्देमाल व आरो सह शेवगाव पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.
◀️दुसरी कारवाई▶️ अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील हादगाव ते बोधेगाव या रोडने
ठिक २३/०० वा. सुमारास ढंपर चालकास ढंपर रोडच्या कडेला बॅटरीच्या सहाय्याने हाताने थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने ढंपर रोडच्या कडेला थांबविला नमूद डंपर चालकास वाळू बाहतूक करण्याचा परवान्याचाबत विचारपूस केली असता त्याने कोणताही परवाना नसलेबाबत कळविले नमूद ढंपर चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) कृष्णा दिनकर कुत्तरवाडे वय-२३ रा. आगसखांड असे सांगितले आहे .
सदर ढंपर चालकास ढंपर कोणाच्या मालकीचा आहे याबाबत विचारपूस केली असता सामने सहर पारा मालक २) भैय्या बोरुडे रा. तिसगाव जि. अहमदनगर (पूर्ण नाव माहिती नई) फा) हा असा अस सांगणेवरून त्याचे आधीक फायद्याकरीता शासकीय वाळू चोरून वाहतूक करीत असल्याचे सांगितले. सदर इंपरवरील चालक-मालक यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे शासकिय वाळु चोरुन वाहतूक करतांना मिळुन आले आहे. सदर ढंपरमधील वाळची वर्णन पुढील प्रमाणे असणारा १०,०००००/-रु किंमतीचा एक विनाक्रमांकाचा राखाडी पांढ-या रंगाच्या डंपर काचेवर इंग्रजीत OM SAI असे लिहीलेले ज वा कि अंदाने २) ४०,०००/- रू.किं,ची दोन ब्रास शासकीय वाळू डम्पींग ट्रॉली मध्ये कि .१०,४०,०००/- असा एकुण मुद्देमाल शेवगाव पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे .वरील चालक मालक यांचे विरुध्द भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे .
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगावचे उपविभागी पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,पोकॉ.शिवाजी ढाकणे, संतोष शंकर लोंढे ,किशोर शिरसाट आदींच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे