नेवाशात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांना रेनकोट वाटप.
नेवाशात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांना रेनकोट वाटप.
नेवासा -
पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ होय समाजातील सर्व घटकांना बोरबर न्याय देण्याचे काम पत्रकार मंडळी करत असतात त्याचं बरोबर पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारांवर हल्ले देखील मोठ्या प्रमाणावर होत यावर संघटनांनी लढा देणे गरजेचे आहे पत्रकारांनी समाजातील उपेक्षित , दुर्लक्षित घटकांचे हित जोपासलं पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासरावं आरोटे यांनी केले नेवासा तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने आयोजित पावसाळी रेनकोट, वाटप कार्यक्रमात बोलत होते
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पावसाळी रेनकोट वाटप व नेवासा तालुका आढावा बैठक कार्यक्रमाचे आयोजन नेवासा येथील कार्यालय येथे करण्यात आले होते राज्य सरचिटणीस विश्वासरावं आरोटे व नेवासा तालुका अध्यक्ष मोहन गायकवाड याच्या हस्ते सर्व पदाधिकारी व सदस्य याना रेनकोट वाटप करण्यात आले
मार्गदर्शक मकरंद देशपांडे, राम शिंदे, उपाध्यक्ष गणेश दारकुंडे , पोर्टल मीडिया प्रमुख ऋषभ तलवार, ग्रामीण विभाग प्रमुख बाळासाहेब पंडित, राजेंद्र कडू, राहुल चिंधे, अमोल मांडण, सचिन कुरुंद, विकास बोर्डे, अल्ताफ शेख, संपादक अशोक शिरसाठ, बादल परदेशी यांच्या सह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषभ तलवार यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष गणेश दारकुंडे यांनी मानले
------------------------------------------------------------------------
संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पत्रकारांना पावसाळी रेनकोट व छत्री वाटप कार्यक्रम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज तालुक्यातील पत्रकारांना रेनकोट वाटप कार्यक्रम घेण्यात आला अश्याच प्रकारे छोटे खाणी कार्यक्रम संघाच्या माध्यमातून भविष्यात देखील घेत राहू
मोहन गायकवाड
नेवासा तालुका अध्यक्ष
------------------------------------------------------------------------