डिग्रस ग्रामपंचायत निवडणुक अतिक्रमण धारकांचे अर्ज छाननीतच बाद करणार, सचिन पवार यांचा इशारा .

डिग्रस ग्रामपंचायत निवडणुक अतिक्रमण धारकांचे अर्ज छाननीतच बाद करणार, सचिन पवार यांचा इशारा .

डिग्रस ग्रामपंचायत निवडणुक अतिक्रमण धारकांचे अर्ज छाननीत बाद करणार -सचिन पवार याांचा इशारा .

          ग्रामपंचायत निवडणुक २०२३ साठी राहुरी तालुक्यात २२ ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया सुरु झाली असून डिग्रस ग्रामपंचायतीच्या निवडणुकी साठी डिग्रस गावातून इच्छुक उमेदवारांकडुन शेवटच्या दिवसांपर्यंत १०९ इतके विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन यामध्ये सरपंच पद हे नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला राखीव पदासाठी जनतेतुन राखीव झाले आहे .

            तसेच गत पंचवार्षीक कालावधीत ग्रामविकासाच्या कामात मोठा भ्रषाचार झाल्याचे गावातील काही तरुणांनी उघड केला व त्यासाठी पंचायत समिती राहुरी येथे ९ दिवस उपोषण करून डिग्रस वासियांच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे ग्राम पंचायती मोठ्या प्रमाणात पैसा आहे म्हणुन अनेकांनी हा दृष्टिकोन विचारात घेऊन हे विक्रमी अर्ज दाखल केले कि काय अशी जोरदार चर्चा डिग्रस पंचक्रोशीत जागोजागी होताना ऐकु येत आहे .  

           डिग्रस गावचे हद्दी शेजारीच राहुरी कृषी विद्यापीठाच्या तसेच सरकारी वन विभागाच्या जमीनी तसेच फार्म व्कॉर्टर असुन येथील ५० पेक्षा जास्त अतिक्रमण धारकांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत .निवडुन आले नंतर ग्रामपंचायत सदस्यामधे हेवेदावे होऊन त्यातुन राजकीय वाद निर्माण होतात अतिक्रमण धारक सदस्याचे विरुद्ध तक्रारी होऊन हे सदस्यत्व रद्द झाल्यास पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागते म्हणुन भविष्यात असे वाद होऊ नये पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये गावचा कारभार ग्रामपंचायत पातळीवर सुरळीत चालावा यासाठी महाराष्ट्र ग्रामपचायत अधिनयम कलम १४ ( १ ) (जे - ३) नुसार निवडणुक निर्णय अधिकारी , व जिल्हाधीकारी यांचेकडे तक्रार करून अतिक्रमण धारकांचे अर्ज छाननीत रद्द करण्यात येणार असल्याचे मत डिग्रस ग्रामस्थ सचिन वसंत पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .