शिवजन्म उत्सवानिमित्त कलश पूजन व शिववंदना संकल्प 21 गावांमध्ये करण्यात आला.

शिवजन्म उत्सवानिमित्त कलश पूजन व शिववंदना संकल्प 21 गावांमध्ये करण्यात आला.

हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त कलश पुजन व शिववंदना संकल्प 21 गावांमध्ये करण्यात आला श्रीक्षेत्र राजुर गणपती येथुन या शिववंदना तसेच कलश पुजनाला गणपती बाप्पांना वंदन करुन सुरुवात करण्यात आली. या कार्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन शिवछत्रपतींचे पुजन करुन कलश पुजन केले . राजुर गणपती, उंबरखेडा, पळसखेड पिंपळे, पिंपळगाव बारव, गाडेगव्हाण, आंबेगाववाडी, अकोला, काचनेरा, तपोवन, खापरखेडा, नळणी,नळणी, बरंजळा साबळे, वरुड, जाफ्राबाद, सावंगी, टेंभुर्णी यांसह 21 गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला पोलिस प्रशासन , राजकिय व्यक्ती, तसेच धर्मगुरुंनीही या उपक्रमाचे कौतुक केले . हिंदवी स्वराज्य ग्रुपचे श्री सचिन फटाले, अविनाश गाढे, कृष्णा कांबळे, सचिन वरगणे, निलेश पठाडे, विलास कुमकर यांनी या उपक्रमाचे नियोजन केले व येणार्‍या काळात 101 गावांमध्ये शिववंदना तसेच तलवारबाजी व लाठीकाठी प्रशिक्षण चालु करणार आहेत असे त्यांनी पोलिस प्रशासनाला कळवले . धनश्रीताई म्हस्के यांच्या सहकार्याने तलवारबाजी व लाठीकाठी प्रशिक्षण महिलांसाठी लवकरच चालु करुन सक्षम, महिला मुली तयार व्हाव्यात यासाठी हा उपक्रम त्यांनी चालु केलाय.

शिवजयंती निमित्त डिजे वाजवुन नाचण्यापेक्षा शिवछत्रपतींनी सांगितलेल्या मार्गाने जिवन जगले तर नक्किच देशाचे नाव लौकीक होईल असा संदेश त्यांनी दिला...!