मराठा एकीकरण समितीचा आदर्शवत शिवजन्मोत्सव राहुरी येथे उत्साहात साजरा.

मराठा एकीकरण समितीचा आदर्शवत शिवजन्मोत्सव राहुरी येथे उत्साहात साजरा.

    राहुरी प्रतिनिधी) – १९ फेब्रुवारी रोजी राहुरी शहरात मराठा एकीकरण समिती संचालित शिवजयंती उत्सव समिती यांच्याकडून शिवजयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.सकाळी आनंद ऋषीजी उद्यानात भव्य रंगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.रागोळी स्पर्धेत उस्पुर्त प्रतिसाद मिळाला.रागोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक सानवी सुम्भे दुसरा क्रमांक संस्कृती पेरणे तिसरा क्रमांक भक्ती लुक्कड यांना देण्यात आला.

दुपारी लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी बालगोपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडे,भाषण,गीत व नृत्य सादर करत सामाजित एकतेचा संदेश दिला.लहान मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन सागर पाटील,विद्या गुंजाळ,वर्षा लांबे यांनी केले.लहान बालकलाकारांच्या कार्यक्रमाने उपस्थित लोकांचे मन जिंकून घेतली.

शिवजयंती पालखी मिरवणूक सोहळ्यास माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांनी भेट देत सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच सर्व स्तुत्य उपक्रमा बद्दल मराठा एकीकरण समिती शिवजयंती उत्सव समिती यांचे अभिनंदन केले.

वकृत्व स्पर्धेत पहिला साक्षी जाधव क्रमांक दुसरा क्रमांक साई सचिन बोरुडे,तिसरा क्रमांक राजवर्धन रविंद्र भोसले यांना देण्यात आला.

राहुरी शहरातून महापुरुषांची वेशभूषा परिधान केलेल्या कलाकारांनी सामाजिक एकत्मेचा संदेश दिला.यापालखी मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठ्याप्रमानावर दिसून आला.पालखी मिरवणूकीचे राहुरी शहरात ठिकठिकाणी रांगोळी हार घालून स्वागत करण्यात आले.शनी चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आलेल्या चौकात पालखी थाबवून आरती करण्यात आली.शुक्लेश्वर चौक येथे रामदास बोरुडे व सचिन बोरुडे यांच्या कुटुंबाच्या वतीने आरती करण्यात आली.

याप्रसंगी आयोजक मराठा संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे पा.म्हणाले की शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा मूळ उद्देश सार्थक होतांनी दिसत आहे.पूर्वी कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात महिला भगिनींचा सहभाग नगण्य दिसत असे.मराठा एकीकरण समिती आयोजित शिवजयंती उत्सव समितीचे सर्व नियोजन महिलांकडे दिलेले आहे.महिलांनी कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन केले आहे.महिलांचा सहभाग वाढल्यामुळे भावी पिढी जिजाऊ, छत्रपतींच्या विचारांची घडविण्यासाठी मोलाचा वाटा राहणार आहे.शिवजयंती घराघरात पोहचवण्याचे काम जिजाऊंच्या लेकी करत आहेत असे लांबे पा.म्हणाले.  

शिवजयंती मिरवणुकीमध्ये ऋषिकेश तारडे यांच्या स्केटिंग समूहाने राहुरी शहरात स्केटिंग प्रात्यक्षिक करून दाखवतात राहूरी करांना अचंबित केले. पालखी मिरवणुकीमध्ये पारंपारिक पद्धतीने लाठी फिरवण्याची कला प्राजक्ता वाघ, प्रज्वल उंडे,शिवराज उंडे,प्रणव उंडे,सार्थक सावंत,सोहम देहडराय,आर्यन देहडराय,कृष्णा हापसे, रोहित बर्डे,ओंकार येवले यांनी सादर केली.

कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून डॉ.अर्चना पाटील व कुलदीप नवले यांनी काम पहिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा लांबे,ज्योती नालकर,अपर्णा धमाळ,दिपाली अडसुरे,राजश्री घाडगे,विद्या अरगडे,जाणका लबडे,ज्योती शेळके,पूनम शेंडे,अनिता शेंडे,अश्विनी पटारे,अर्चना ढेपे,देवेंद्र लांबे,राजेंद्र लबडे,राजेंद्र गुंजाळ,संदीप गाडे,दिनेश झावरे,सतिष घुले,विनायक बाठे,अविनाश क्षिरसागर,आशिष गागरे यांनी परिश्रम घेतले.   

कार्यक्रमास मराठा एकीकरण समिती,आम्ही जिजाऊंच्या लेकी,आम्ही राहुरीकर ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

१९ फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणावर लग्न सोहळे घरगुती कार्यक्रम ठेवले जातात. त्याचा परिणाम शिवजयंती उत्सव कार्यक्रमावर होतो.लहान मुले महिला यांचा यांना सहभाग घेता येत नाही. त्यामुळे भविष्यकाळात १९ फेब्रुवारी शिवजयंती किंवा सर्वच महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी कुठलेही इतर कार्यक्रम ठेवू नये याचे प्रबोधन केले जाणार आहे. - मराठा एकीकरण समिती*