देडगाव येथील बबनबाई सत्यदान हिवाळे जाण्याने कुटुंबाचा आधारवड हरपला

देडगाव येथील बबनबाई सत्यदान  हिवाळे जाण्याने कुटुंबाचा आधारवड हरपला

*बबनबाई सत्यदान हिवाळे जाण्याने कुटुंबाचा आधारवड हरपला.*

          बालाजी देडगाव ( प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील हिवाळे परिवारातील बबनबाई सत्यदान हिवाळे जाण्याने कुटुंबाचा आधारवड हरपला आहे.

            अतिशय खडतर प्रवासातून गेलेल्या बबनबाई गेली 35 वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबाचा कणा मोडला परंतु चार मुले व तीन मुली असल्याने दुःखातून सावरून प्रपंचासाठी पुन्हा उभी राहिली व मुलांसाठी नव्या जोमाने प्रपंचाचा गाडा ओढण्यास सुरुवात केली. अतिशय काबाडकष्ट करून मुलांची शिक्षण , मुलींचे लग्न , घर प्रपंच अशा अनेक जबाबदाऱ्या जीवनात पार पाडल्या व वडील - आई दोघांची माया लेकरांना दिली. परंतु फाटक्या संसाराला कधीही डगमगल्या नाही म्हणून संसार अगदी नीटनेटका केला आज एक आदर्श कुटुंब म्हणून त्या कुटुंबाकडे पाहिले जाते. व सर्व गोष्टी देवांना भिऊन त्या करत असायच्या.

          सर्व कुटुंबातील आनंदित होते परंतु नियतीने काळाचा घाला घातला व वृद्धपकाळाने त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी त्यांचे वय 90 वर्षे होते. त्यांनी आपली मुले नातवंडे व परतुंडे पाहिली.

         त्यांच्या पश्चात चार मुले देवदान (अण्णा ) हिवाळे , मा. ग्रामपंचायत सदस्य संजय हिवाळे, विजय हिवाळे व उद्योजक रजनीकांत हिवाळे व मुली जावई, भाऊ, सुना, नातवंडे , परतुंडे असा मोठा परिवार आहे.