दत्तनगर ते नगरपरिषद हद्दीतील स्ट्रीट लाईटचे उद्घाटन, जनतेनं राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज- आ. कानडे .

दत्तनगर ते नगरपरिषद हद्दीतील स्ट्रीट लाईटचे उद्घाटन, जनतेनं राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज- आ. कानडे  .
दत्तनगर ते नगरपरिषद हद्दीतील स्ट्रीट लाईटचे उद्घाटन, जनतेनं राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज- आ. कानडे  .

श्रीरामपूर- निवडणुकीचे ढोल वाजायला लागले की अनेक भूछत्र उगवायला लागतात. स्वप्ने सर्वांनीच पहावीत. परंतु उगाचच जनतेची स्वप्न पायदळी तुडवली जाणार नाहीत, याचे भान लोकप्रतिनिधी ठेवले पाहिजे. लोकशाहीने दिलेल्या हक्क व अधिकाराचा आदर ठेवला पाहिजे. माझी लढाई स्वाभिमानाची व आत्मसन्मानाची असून तो आत्मसन्मान सर्वांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी सोबत राहावे, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले.

              श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ते नगरपरिषद हद्दीतील 25 लक्ष रुपये खर्चाच्या स्ट्रीट लाईटचे उद्घाटन आ. कानडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, समन्वयक प्रविण काळे, दत्तनगरच्या लोकनियुक्त सरपंच सारिका कुंकूलोळ, माजी सरपंच सुनील शिरसाठ, प्रेमचंद कुंकूलोळ, प्रताप देवरे, दीपक कदम, सुगंधराव इंगळे,  सुरेश जगताप व्यासपीठावर उपस्थित होते.

            आ. कानडे म्हणाले, दत्तनगरशी माझे भावनिक नाते आहे. दत्तनगर व भैरवनाथनगर ग्रामपंचायतची आँर्डर माझ्या सहीने झाली आहे. मी प्रोफेशनल पुढारी नाही. डॉ. बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला शिकायला मिळाले. जिथे जिथे अंधार असेल तेथे प्रकाश पेरण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केले. त्यांचा विचार सोबतीला घेऊन आपण काम करीत आहे. आम्ही आमच्या अडाणीपणा व दुर्बलतेमुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या गुलामगिरीमध्ये अजूनही सहजपणे अडकलो आहोत. दुर्दैवाने आज विचाराचे राजकारण मागे पडून भाईगिरी चे राजकारण सुरू झाले आहे. जे स्वतःला सिंह व वाघ समजतात, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज आहे. जे राजकारणाचे मक्तेदार झाले आहेत त्यांचे खोकलेपण समजून घेतले पाहिजे तसेच प्रोफेशनल गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज आहे हे समजून घेतले पाहिजे.

              दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीत जात्यंध व धर्मांध विचार रुजता कामा नये, यासाठी आपण तुमच्या पाठीशी उभा राहिलो, नगर-मनमाड व पुणे-औरंगाबाद या हायवेच्यामध्ये श्रीरामपूर शहर आहे या शहरातून जाणारा बाभळेश्वर ते नेवासा फाटा हा रस्ता पूर्वी बैलगाडीच्या वाट्याएवढा होता. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींना तो मोठा करता आला नाही. त्यासाठी मी तीनही तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेल्या या रस्त्यासाठी 167 कोटी रुपये निधी आणला. आज शहराच्या चारही बाजूचे रस्ते चौपदरी झाले आहेत. आज काहीजण ते आम्हीच आणले, असे सांगत आहेत. सरकार बदललेले असताना आपण गेल्या आठ दिवसात 68 ते 70 कोटींच्या कामाचे भूमिपूजने व उद्घाटने केली आहेत. लाख पुलासाठी आपण निधी आणल्याचे मी उद्घाटनप्रसंगी पालकमंत्र्यांसमोर ठणकावून सांगितले. त्यांनीही ते मान्य केले. रस्त्यांसाठी तीन ते चार थर असतात हे आपण आमदार झाल्यानंतर लोकांना समजले. विकास कामे करताना सर्वांना बरोबर घेऊन करायचे असते. लोकांच्या कल्याणाच्या गरजेची कामे हाती घेणे आणि ते गुणवत्तेने करणे महत्त्वाचे असते आपण ते केल्याचे आमदार कानडे यावेळी म्हणाले.

           

यावेळी सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुनील शिरसाठ यांची भाषणे झाली,प्रताप देवरे यांनी स्वागत व् सूत्रसंचालन केले.  यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, लखन कडवे, सुरेश शेवाळे, पोपट पठारे, अशोक लोंढे, रितेश काटे, शाहजान बागवान, रवींद्र लोंढे, मनोज काळे आदींसह दत्तनगर येथील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...........