पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका महिला अध्यक्ष पदी सौ. सुप्रियाताई काशीद

पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका महिला अध्यक्ष पदी सौ. सुप्रियाताई काशीद

बी पी एस राष्ट्रीय न्यूज.

जिल्हा प्रतिनिधी सम्मेद तरटे.

बार्शी (ता.बार्शी).      शहर दि.०८/०३/२०२२ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस जाणिवा सेवा संघ बार्शी शहर व तालुका नूतन महिला बॉडी स्थापन करण्यात आली.

पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री रवि सर फडणीस यांच्या आदेशानुसार तसेच बार्शी तालुका पदाधिकारी व सदस्य यांच्या सर्वानुमते महिला बॉडी स्थापन करण्यात आली.

त्यावेळी बार्शी तालुका विभाग प्रमुख उमेश आनेराव यांच्या सही च्या सहाय्याने नियुक्तीपत्र देण्यात आले. पोलीस जाणीव सेवा संघ महिला कार्यकारिणी मंडळीचे नियुक्ती पत्र वैद्यकीय अधिकारी बार्शी सौ. शितल बोपलकर यांच्या हस्ते तथा सौ. रूपाली समाधान विधाते, सौ. अमृता उमेश आनेराव, सौ. मनीषा भगवान लोकरे यांच्या उपस्थितीत खालील प्रमाणे गौरविण्यात आले.

बार्शी तालुका अध्यक्ष- सौ. सुप्रिया विष्णू काशीद, तालुका संघटक- सौ रेणुका शिरीष जाधव, बार्शी उप संपर्कप्रमुख- सौ. राजश्री बाबासाहेब कदम, शहराध्यक्ष- सौ मनीषा साळुंखे, शहर उपाध्यक्ष- सौ. कौशल्या महादेव राऊत, बार्शी शहर सचिव सौ. अर्चना गणेश शिंदे, सहसचिव सौ. वैभवी विजय माळी, बळेवाडी महिला अध्यक्ष- सौ. वर्षा सम्मेद तरटे, सौ.राजश्री अभिजीत माळी, सौ.सरिता रमेश डोंगरे.

यावेळी उपस्थित मान्यवर पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका विभाग प्रमुख- श्री उमेश आनेराव, उपविभाग प्रमुख- श्री समाधान विधाते, शहराध्यक्ष- श्री अभिजीत माळी, तालुका अध्यक्ष- संतोष दराडे, बार्शी कार्याध्यक्ष- श्री रमेश डोंगरे, बळेवाडी शाखाप्रमुख तथा बी पी एस राष्ट्रीय न्यूज जिल्हा प्रतिनिधी- श्री सम्मेद तरटे, प्रमुख मार्गदर्शक- श्री भगवान लोकरे सर, श्री विजय माळी, श्री दत्ता माने,श्री विजय काकडे,श्री आनंद बोराडे आदि कार्यकारी मंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.