महामार्गावर रात्रीच्या वेळी डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश .
गेल्या दोन दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर येथे आठ गावठी कट्टे पकडले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे. सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे पोलीस नाईक भिमराज खर्से,पोलीस कॉन्स्टेबल रंजीत जाधव व सागर ससाने हे गुन्ह्याचा तपास करत असताना.20.06.2022रोजी पहाटेच 4 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर येथील कार्यालयातून मध्यप्रदेश कडे जाण्यासाठी निघाले असता, वडगाव गुप्ता परिसरात काही इसम ट्रक जवळ गाडी उभा करून संशयास्पद हालचाली करताना दिसून आले.
घटनेचा मागोवा घेण्यासाठी पोलिस जवळ गेले, पोलिस जवळ येताना दिसताच आरोपी ट्रकमध्ये बसून राहुरीच्या दिशेने पसार होऊ लागले.
घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी अनिल कटके यांना चालू गाडीतच फोनवर माहिती देत सदर गाडीचा पाठलाग सुरू केला. सदर टोळी डिझेल काढीत असल्याची माहिती देण्यात आली.
सदर पथकाने क्षणाचाही विलंब न करता राहुरी व सोनई पोलीस स्टेशनची दूरध्वनीवरून संपर्क साधला. व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोनई पोलीस स्टेशन व राहुरी पोलीस स्टेशन यांनी तात्काळ नाकेबंदी केली.
परंतु आरोपी सराईत गुन्हेगार असल्याकारणाने नाकेबंदी केल्यामुळे गाडी शनिशिंगणापूर राहुरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला बेवारस सोडून दिली व अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या शेतातून पलायन केले.
आरोपीने बेवारस सोडलेल्या वाहनाची तपासणी केली असता प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये डिझेल भरलेले सापडले.
या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्यप्रदेश कडे रवाना झाले.
वरील घटनेबाबत ची फिर्याद फिर्यादी विनायक विठ्ठल सानप राहणार दत्तनगर वडगाव गुप्ता यांनी फिर्याद दिली होती की
20.6.2022 रोजी पहाटे च्या सुमारास स्टील ने लोड झालेल्या ट्रेलर रोडच्या कडेला लावून केबिनमध्ये झोपले असताना दोन अज्ञात इसमांनी केबिनमध्ये बसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व धारदार शास्त्राचा धाक दाखवला.
तर खाली उभ्या असलेल्या तीन इसमांनी डिझेलच्या टाकीतून 3900 रुपये किंमतीचे 380 लिटर डिझेल प्लॅस्टिकचे ड्रममध्ये भरले. व स्कार्पिओ मध्ये ड्रम टाकून पसार झाले .सदर घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर डिझेल चोरीचा गुन्हया बाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुन्ह्याचा तपास करण्याबाबत गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची नेमणूक करून गुन्ह्याचा तपास करण्याबाबतच्या सूचना केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, पोलीस नाईक सोपण गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप घोडके, मनोज गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, रवी सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप शिंदे, संदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे, शिवाजी ढाकणे, रणजी जाधव व चालक हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे हे कारवाई करण्यासाठी तर तात्काळ रवाना झाले.
पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याची माहिती घेत असताना गुप्त सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी हे चांदा तालुका नेवासा येथे कैलास दहातोंडे यांच्या वस्तीवर भाडोत्री खोलीत राहत असून सामानाची आवरा आवर करुन मध्यप्रदेश मध्ये पळून जाण्याच्या तयारीत आहेत. तात्काळ गेल्यास सापडतील. पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचून आरोपी रहात असलेल्या घराच्या आजूबाजूला सापळा रचला पोलिसांच्या हालचाली लक्षात येताच आरोपी शेतातील पिकाचा फायदा घेऊन पळू लागले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या चंचल व कर्तव्यदक्ष अधिकारी व अंमलदार यांनी दोन किलोमीटर पाठलाग करून आरोपींना पकडले त्यांना त्यांचे नाव विचारले असता.
1)राजाराम गंगाराम फुलरिया वय-38
2)धर्मेंद्र शिवनारायवयणउर्फ शिवलाल सोलंकी वय 27
3 ) राहुल जुगल किशोर चंदेल वय 21
4)अशोक रामचंद्र मालविया वय 21
5)गोविंद पिरूलाल मालविया वय 30
सर्व राहणार मध्य प्रदेश,
सुरुवातीला यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ निर्जनस्थळी आम्हीच सोडली अशी कबुली दिली सदरचा गुन्हा आमच्याच परिचयाच्या .
आरोपी क्रमांक
6) अनिकेत राजेंद्र बोरणार वय 24राहणार उस्थळ दुमाला तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. याच्या संगनमताने गुन्हा केलेला असून त्याच्या घरी गेले असता तो सापडेल अशी कबुली दिली त्याप्रमाणे सदर आरोपीला ताब्यात घेतले असून मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे.
सदरचे आरोपी हे सराईत व अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या गुन्हा अंतर्गत चोरी, दरोडे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण, अजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी केली.