नेवासा तालुक्यातील माका विद्यालयाचे देडगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर संपन्न.
माका महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर संपन्न
नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका चे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिर 03 जानेवारी 2023 ते 09 जानेवारी 2023 या कालावधीत बालाजी देडगाव येथे संपन्न झाले . कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे मा . स्वरूपचंद गायकवाड सर हे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे होते .
कार्यक्रम प्रसंगी माजी प्राचार्य भाऊराव मुंगसे सर, आदर्श वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार प्रदान प्राप्त ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके , पत्रकार युनूस पठाण , मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी भाऊराव मुंगसे सर यांनी सामाजिक जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना बळकट होण्याबरोबरच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधला जातो . तसेच ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देडगावातील श्रमदान , वृक्षारोपन , जनजागृती , ग्रामस्वच्छता यासारखे समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले . प्रमुख पाहुणे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड यांनी वृक्षारोपण व मतदान जनजागृती यांचे सामाजिक जीवनातील महत्त्व विशद केले .
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक निखिल निपुंगे यांनी केले . पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा . वसंत पुंड तर आभार प्रदर्शन सहकार्यक्रम अधिकारी प्रा . अमोल दरंदले यांनी केले . कार्यक्रमाप्रसंगी कुमारी जया शिंदे व कुमारी मनीषा तोगे यांनी सूत्रसंचालन केले .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे उपप्राचार्य वसंत पुंड कार्यक्रम अधिकारी प्रा . निखिल निपुंगे सहकार्यक्रम अधिकारी प्रा . अमोल दरंदले , प्रा. मोनाली गायके व सर्व प्राध्यापक वृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते .