पत्रकार दिन निमित्त वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारित श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेट च्या वतीने केला पत्रकारांचा सन्मान.

पत्रकार दिन निमित्त वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारित श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेट च्या वतीने केला पत्रकारांचा सन्मान.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री.संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या वतीने पत्रकाराचा सन्मान करण्यात आला.

      अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर अग्रेसर असलेली श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या 57 शाखा व 6 लाखाहून अधिक ग्राहक असणारी एकमेव विश्वसनीय संस्था की जी 365 दिवस अविरत चालते. म्हणून या कामाबद्दल या संस्थेला वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळाला .कारण ही संस्था नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते. त्यांना सामाजिक जाणीव च्या भावनेतून आज नागेबाबा परिवाराच्या वतीने देडगाव शाखेमध्ये की ज्यांना आदर्श वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार मिळाला असे पत्र

कार बन्सीभाऊ एडके व पत्रकार युनूसभाई पठाण यांचा विचारवंतांचे पुस्तक व दिनदर्शिका देऊन सन्मान करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

         यावेळी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेचे खातेदार ह भ प सदाशिव महाराज पुंड,गुरुदत्त ट्रान्सपोर्टचे संचालक अमोल तांबे , मा. ग्रामपंचायत सदस्य पोपट कोकरे, उद्योजक बाळासाहेब चोपडा, पोपट मुंगसे, बाळासाहेब मुंगसे, शाखा अधिकारी पांडुरंग एडके साहेब, अमोल आडवाने , सुलभाताई नांगरे आदी ग्राहक व खातेदार उपस्थित होते.