पुणे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सौ. सुप्रियाताई सुळे (बारामती), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), व रविंद्र धंगेकर (पुणे) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
पुणे( प्रतिनिधी ):- पुणे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सौ. सुप्रियाताई सुळे (बारामती), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), व रविंद्र धंगेकर (पुणे) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. याप्रंसगी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजित कदम, आ. संग्राम थोपटे, आ.अशोकबापु पवार, आ.सचिन अहिर, आ.संजय जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीने आणि देशासाठी व राज्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील सुप्रियाताई सुळे, डॉ. अमोल कोल्हे व रवींद्र धंगेकर या तीन उमेदवारांकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. हे तीनही उमेदवार आदर्श प्रतिनिधित्व करणारे असून ते आपल्याला लोकसभेत पाठवायचे आहेत. तेव्हा त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी करून या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचंड मताधिक्याने विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.