रिपब्लिकन सेनेचा सोमवार दि.१२.०९.२०२२ रोजी ता. राहुरी पोलिस स्टेशनवर भव्य धडक मोर्चा. राजुभाऊ आढाव ...

रिपब्लिकन सेनेचा सोमवार दि.१२.०९.२०२२ रोजी ता. राहुरी पोलिस स्टेशनवर भव्य धडक मोर्चा. राजुभाऊ आढाव ...

रिपब्लीकन सेनेचा राहूरी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा

  राहुरी कृषी विद्यापीठ

     तांभेरे येथिल निळा झेंडा प्रकरणात कोणतिही चौकशी नकरता एफ्आय आर दाखल नसताना मागासवर्गीय महीला पुरुषांना बेकायदेशीर डांबून ठेवण्यात आले तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्या , लुटमार घरफोड्या , मारामाऱ्या अवैद्य धंदे यांना आळा घालण्यासाठी राहुरी पोलीस प्रशासन अपयशी ठरले असुन कायदा व सुव्यवस्था अक्षरशः ढासाळलेली दिसुन येते मागसवर्गीय . दिनदलीत भटके विमुक्त जाती जमातीवर पोलीस प्रशासना कडून अन्याय होत आहे तसेच तांभेरे येथिल निळा झेंडा प्रकरणी काही मनुवादी वृत्तीच्या लोकांचे ऐकुन मागासवर्गीयांना अटक करून न्यायालयाची दिशाभुल करून पोलीस कस्टडीत डांबून ठेवून अन्याय केला तांभेरे गावातील मनुवादी वृत्तीच्या लोकानी आंबेडकरी समाजाच्या लोकांना दळण किराणा दुध इत्यादी जिवणावश्यक वस्तु मिळण्यावर बंदी घातली व वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला अशा लोकांवर कारवाई करण्या ऐवजी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी या लोकांना पाठीशी घालुन मागासवर्गीयांवर एकतर्फा कारवाई केली या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चालु असुन हा तपास गतीमान व्हावा व या प्रकरणात दोषी असलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तपासी अधिकारी पि एस आय मधुकर शिंदे बिट हवालदार ज्ञानदेव गर्जे कोर्ट अॅडली ताके यांचेवर भा द वी दंडसंहिते प्रमाणे तसेच अनुसुचित जाती जमाती प्रबंधक कायाद्याच्या तरतुदी प्रमाणे कारवाई व्हावी या मागण्या घेऊन दि १२ / ९ / २०२२ रोजी राहुरी पोलीस स्टेशनवर रिपब्लीकन सेनेच्या वतीने धडक मोर्चा नेणार असल्याची माहिती रिपब्लीकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ आढाव यांनी माध्यमांना दिली आहे . . .