डिग्रस ता.राहुरी बबन लक्ष्मण राहींज व अशोक सिताराम काळे यांनी लाटले गायगोठ्या चे प्रत्येकी ७७ooo रु अनुदान.

डिग्रस ता.राहुरी बबन लक्ष्मण राहींज व अशोक सिताराम काळे यांनी लाटले गायगोठ्या चे प्रत्येकी ७७ooo रु अनुदान.

डिग्रस ता. राहुरी येथील शेतकरी बबन लक्ष्मन राहींज व अशोक सिताराम काळे यांनी लाटले गायगोठ्याच्या नावाखाली प्रत्येकी ७७००० रुपयाचे अनुदान

 याबाबत समजलेली माहीती कि डिग्रस येथील शेतकरी बबन राहींज व अशोक सिताराम काळे यांनी सन 2022मध्ये अनुदानीत गायगोठा प्रकरण सादर करून मंजूर करून घेऊन ७७००० रुपयाचे अनुदान घेतले मात्र सदर गायगोठा बांधण्याऐवजी बबन राहींज चक्क कांदा चाळ म्हणून वापर केला तर अशोक काळे यानी राहाते घर बांधून मनरेगा योजनेचा गैरफायदा घेऊन या शासकीय यत्रणेची फसवणुक केली असल्याची बाब दि १६/९/२०२३ रोजी डिग्रस येथे झालेल्या ग्रामसभेत उघड झाली ग्रामसभेत सदर गोठ्यां बद्दल योगेश चंद्रभान पवार , सतिष बोरुडे तान्हाजी पवार राहुल मोरे यांनी प्रश्न उपस्थित करून प्रत्यक्ष पहाणी करण्याची मागणी केली सदर मागणीची दखल घेऊन ग्रामसेवक सुरेश डोंगरे ,आशाताई नजन , ग्रा प सदस्य राजु बल्हेकर अजय गावडे ,वैभव जाधव ज्ञानेश्वर भिंगारदे योगेश पवार किरण पवार सुधिर बोरुडे देविदास बनसोडे,सतिश पवार.किशोर पवार. सुरज पवार.निलेश पवार.अमर मकासरे. स्वप्नील बोरुडे.यांनी प्रत्यक्ष पहाणी केली असता सदर लाभ धारकांकडे एकही गाय नसुन सदर अनुदानीत गोठ्यांचा चक्क कांदा साठवण आणी राहात्या घरासाठी वापर करणात येत असल्याचे निदर्शनास आले ज्या प्रयोजनासाठी अनुदान घेतले त्याचा वापर त्याच प्रयोजनासाठी केले नाही म्हणुन सदर अनुदान परत घ्यावे व शासकीय यंत्रनेची सदर लाभार्थ्यानी फसवणुक केली म्हणुन त्याचेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली

अशी माहिती योगेश व ज्ञानेश्वर भिंगारदे.सुरज पवार. यांनी माध्यमांशी बोलतांना योगेश पवार म्हणाले कि डिग्रस गावातील अनेक कामांत घोटाळे झाले असून ते पुराव्या सह आम्ही उघड करणार आहोत असे आव्हाहन ही त्यांनी केले.