पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराविरुद्ध खेडले परमानंद येथील ग्रामस्थांनी मोर्चा काढून जाहीर निषेध करत केले ठिय्या आंदोलन .
खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराविरुद्ध जाहीर निषेध मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले .यावेळी ऑनलाइन डाटा एन्ट्री समस्या ,नवीन रेशन कार्ड त्याचप्रमाणे ऑनलाइन असूनही अनेकांना अनेक दिवसापासून शिधा मिळत नसल्याच्या कारणामुळे ग्रामस्थ संतप्त झाले .
वर्षानुवर्ष हेलपाटे मारून पुरवठा विभागाकडून काम होत नसल्यामुळे अखेर शेवटी ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला व आज दिनांक पाच डिसेंबर रोजी नेवासा तहसील कार्यालयावर खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने निषेध मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले .
प्रशासनाच्या वतीने सदर आंदोलनाची दखल घेत नेवासा तहसीलदार पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन यांनी ग्रामस्थांच्या समस्यांची दखल घेत लवकरात लवकर ग्रामस्थांचे काम प्राधान्याने करून देण्याचे आश्वासित केले .
सदर आंदोलनास खेडले परमानंद येथील उपसरपंच जावेद इनामदार तंटामुक्ती अध्यक्ष गुलाब शेख ,बशीर भाई इनामदार ,शिवाजी राजळे , कासम भाई शेख ,रशीद इनामदार , कासम भाई इनामदार ,श्याम सुंदर केदारी ,वाघू बर्डे फय्युम इनामदार शांतीलाल राऊत सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग व महिला उपस्थित होत्या .